आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा वाद:निर्माता करण जोहरवर आमिर खानचा भाऊ फैजल खानने लावला आरोप, म्हणाला - आमिरच्या बर्थडे पार्टीत करणने केला होता अपमान

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फैजल खानने सांगितले, करणने माझा अपमान करत त्या माणसाला मला बोलू दिले नाही.

आमिर खानचा भाऊ फैजल खानने चित्रपट निर्माता करण जोहरने त्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत, बॉलिवूडमध्ये पक्षपाती वृत्तीबद्दल बोलताना ताे म्हणाला, आपले काम फ्लॉप झाले तर ते तुमच्याशी चांगले वागत नाहीत. ते तुमच्याकडे पाहतदेखील नाहीत. माझ्यासाेबत असे झाले आहे.

  • आमिरच्या बर्थडे पार्टीत केला होता माझा अपमान

फैजलने सांगितले, माझा भाऊ आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत कुणी माझा अपमान केला हाेता. तो करण जोहर होता, तो माझ्याशी विचित्र वागला. मी कुणाशी तरी बोलत होतो, तेव्हा तो तेथे आला आणि त्याने माझा अपमान करत त्या माणसाला मला बोलू दिले नाही.

  • ‘मेला’नंतर मला बाजूला सारले

आमिरसाेबत मेला चित्रपट केल्यानंतर निर्माते माझी मदत करतील, असे मला वाटले हाेते, मात्र तसे काही झाले नाही. उलट मला बाजूला सारण्यात आले. खरं तर, बाहेरच्या लाेकांना इंडस्ट्रीत स्थायिक होणे काही नवे नाही, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि आयुष्मान खुराणासारख्या कलाकारांनी ते करून दाखवले. इंडस्ट्रीतील लोकांना फक्त सुरुवातीला त्याचा फायदा मिळतो, जसा मला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...