आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्यता:गलवान खो-यातील तणावामुळे आमिरचा लडाखमध्ये चित्रीकरण न करण्याच्या निर्णय, कारगिलमध्ये सुरु होणार 'लाल सिंह चड्ढा'चे पुढे शेड्युल!

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'लाल सिंह चड्ढा' हा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रीमेक आहे.

लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आमिर खानने त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचे लडाख येथील चित्रीकरण रद्द केले आहे.  मिड-डेच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि प्रॉडक्शन हाऊसशी बोलल्यानंतर आमिरने लडाखमध्ये शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखमधील शूटिंग आता कारगिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनुसार, सद्यस्थितीत लडाखमध्ये शूटिंग होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत आमिर, अद्वैत आणि प्रॉडक्शन हाऊस शुटिंग कारगिलमध्ये हलविण्यावर विचार करत आहेत. अंतिम कॉल काही आठवड्यांत घेतला जाईल.

आमिरला कोरोनाची भीती : सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, “काही दिवसांपूर्वी आमिरच्या स्टाफ सदस्यांनाही कोरोनाची लागन झाली होती, त्यानंतर आमिर अधिक घाबरला आहे. त्याला कलाकार आणि क्रूसाठी कोविड -19 चा कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नाही, त्यामुळे तो विचारपूर्वक शूटिंग पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहे.'

लॉकडाऊनमुळे शूटिंग रखडले होते: चित्रपटाचे शूटिंग चंदीगडमध्ये सुरू होते पण मार्चमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे ते थांबवावे लागले. या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त करीना कपूर खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रीमेक: 'लाल सिंह चड्ढा' हा  'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रीमेक आहे. मूळ चित्रपटात, फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. मात्र तरीही यश संपादन करतो आणि प्रसिद्ध होतो. पण त्याचे खरे प्रेम त्याला सोडून जाते.

या चित्रपटाला ऑस्करमध्ये एक डझन नामांकने मिळाली होती आणि सहा पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते. टॉम हँक्सला यासाठी सलग दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट लेखक विन्स्टन ग्रूम यांच्या 1986 मध्ये आलेल्या कादंबरीवर आधारित होता. हिंदी रिमेकमध्ये आमिर टॉम  हँक्सची भूमिका साकारणार आहे.

आमिरचा अखेरचा चित्रपट 2018 मध्ये आला: यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मध्ये आमिर खानला अखेरच्या वेळी पाहिले होते. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

बातम्या आणखी आहेत...