आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:आमिर खानच्या घरातील कर्मचारी पॉझिटिव्ह; कुटुंबातील सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह, पण आई झीनतची तपासणी होणे बाकी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिरने त्याच्या घरातील एकापेक्षा जास्त कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे.

अभिनेता आमिर खानचे घरही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. आमिरने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्याने सांगितल्यानुसार, त्याच्या घरातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ज्यानंतर तातडीने त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली गेली. या तपासणीत आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. परंतु त्याची आई झीनत हुसैन यांची तपासणी अजून बाकी आहे. आमिरने आपल्या चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 

  • बीएमसीचे मानले आभार

आमिर खानने आपल्या या पोस्टमध्ये बीएमसीचे आभार मानले आहेत. पण त्याने त्याच्या घरातील एकुण किती कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली याचा आकडा सांगितलेला नाही. हा आकडा एकापेक्षा अधिक असल्याचा उल्लेख मात्र त्याने केला आहे. सर्वांना क्वारंटाइन केले गेले आहे. आमिरने बीएसीकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय मदतीबद्दल आभार मानले आहेत. तसेच कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांनाही त्याने धन्यवाद दिले आहेत.

गेल्या महिन्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या स्टाफमधील दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. करणने स्वत: ही माहिती बीएमसीला दिली होती. त्यानंतर संक्रमित व्यक्तींना घराच्या एका भागात क्वारंटाइन करण्यात आले होते. करणचे संपूर्ण कुटुंबदेखील होम आयसोलेशनमध्ये होते.

  • या सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला कोरोना

यापूर्वी बोनी कपूर यांच्या घरातील कर्मचार्‍यांना कोरोना इन्फेक्शन झाले होते. मलायका अरोराच्या बिल्डिंगमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला गेला होता. याशिवाय झोया मोरानी, ​​करीम मोरानी, ​​शाजा मोरानी, ​​किरण कुमार, कनिका कपूर आणि मोहेना सिंग हे सेलिब्रिटीही कोरोनाग्रस्त झाल्यानंतर आता पूर्णपणे बरे झाले आहेत.