आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचे कामाविषयीचे समर्पण:'लालसिंग चड्ढा'च्या चित्रीकरणादरम्यान आमिर खान जखमी, दुखापत होऊनही चित्रीकरण करण्याचा घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिरला ठरलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचे होते पूर्ण

अभिनेता आमिर खान सध्या 'लालसिंग चड्ढा' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. एका दिवसापूर्वीच त्याचे दिल्लीचे शेड्युल पूर्ण झाले. मात्र चित्रीकरणादरम्यान आमिरच्या बरगडीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. मात्र वर्क कमिटमेंटमुळे त्याने पेनकिलर्स खाऊन दिल्लीतील शेड्यूल पूर्ण केले आहे.

  • आमिरला ठरलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचे होते पूर्ण

शूटिंग सेटशी संबंधित एका सूत्रानुसार- अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान आमिरला ही दुखापत झाली. मात्र, चित्रपटाचे शूटिंग यामुळे थांबविण्यात आले नाही. गंभीर दुखापत नसल्याने आमिरने औषधांच्या मदतीने पुन्हा शूटिंग सुरू केले. कोरोनामुळे आधीच चित्रीकरण लांबणीवर पडले होते. मात्र आता चित्रीकरणास उशीर होऊ नये, म्हणून आमिरने दुखापत होऊनही चित्रीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

  • 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक आहे हा चित्रपट

कोरोनामुळे 'लालसिंग चड्ढा'ची चित्रीकरणादरम्यान सेटवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. चित्रपटाच्या कथेनुसार फ्लॅशबॅकचा एक रनिंग सिक्वेन्स शूट करण्यासाठी आमिर सतत धावत होता. त्याचदरम्यान त्याला दुखापत झाली. आमिरचा हा चित्रपट टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अलीकडेच करीना कपूर खान हिने चित्रीकरण पूर्ण केल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती.

बातम्या आणखी आहेत...