आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचे 'विक्रम वेधा'मधून बाहेर पडण्यामागचे खरे कारण:भारत-चीन तणावामुळे सुपरस्टारने सोडला होता चित्रपट, आमिरला चीन बेस्ड हवी होती चित्रपटाची कथा

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान

दक्षिणेतील ‘विक्रम वेधा’ या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. तामिळमध्ये बनलेल्या या चित्रपटात विजय सेतुपती आणि आर. माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. सुपरस्टार आमिर खान हिंदी रिमेकमध्ये गँगस्टरची भूमिका करू शकताे, अशी अलीकडच्या काही महिन्यांपर्यंत चर्चा हाेती. मात्र ताे नंतर या चित्रपटातून बाहेर पडला. आमिरला स्क्रिप्टमध्ये काबी बदल हवे होते, त्यामुळे त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे म्हटले गेले होते. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.

आमिरला चीन बेस्ड हवी होती चित्रपटाची कथा
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आशियातील प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन माेठ्या स्तरावर ‘विक्रम वेध’ बनवावा अशी आमिरची इच्छा होती. चीनमध्ये त्याची खूप क्रेझ असल्याने चित्रपटाची कथा चीन आधारित व्हावी अशी त्याची इच्छा होती. पण भारत-चीन सीमा वाद व नंतर कोविडमुळे ही संकल्पना दुर्दैवाने बदलावी लागली. आमिरला हे मान्य नव्हते आणि त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आता या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान

दक्षिणेतील ‘विक्रम वेधा’ या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी निर्मात्यांनी आता हृतिक राेशन व सैफ अली खान यांची निवड केली आहे. हृतिक रोशन पुढच्या महिन्यापासून 'विक्रम वेध'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मूळ चित्रपटाची दिग्दर्शक जोडी पुष्कर-गायत्री यांनी नुकतीच मुंबईत लोकेशनची निवड केली असल्याचे सूत्रांकडून समजते. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईतच होणार आहे, यासाठी शहरातील विविध भागात लखनौची वेगवेगळी लोकेशन्स रिक्रिएट केली जाणार आहेत. चित्रपटात हृतिक प्रथमच पोलिस अधिकारी म्हणून दिसणार आहे, तर सैफ अली खान गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दोन अभिनेत्री असणार आहेत, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...