आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:आमिरने दिली गुप्त देणगी, पीएम आणि सीएम रिलीफ फंडासह रोजंदारी मजुरांना मदत पोहोचवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिर खान लॉकडाऊनपुर्वी 'लाल सिंह चड्ढा'ची शूटिंग करत होता.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळाच बॉलिवूडचे कलाकार केवळ सरकारी मदत निधीला पैसे देत नाहीत तर ते रोजंदारी मजुरांनाही मदत करत आहेत. मदत करणा-या सेलिब्रिटींच्या यादीत आमिर खानचे नाव ऐकिवात न आल्याने सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पण सत्य मात्र वेगळे आहे. या संकटाच्या घडीत आमिरही संपूर्ण देशासोबत उभा आहे.

  • आमिरने केले गुप्त दान

अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आमिरने पीएम केयर्स फंड आणि महाराष्ट्राच्या सीएम रिलीफ फंडसह फिल्म वर्क्स असोसिएशन आणि काही स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत पाठविली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटासाठी काम करणा-या रोजंदारी मजुरांनाही मदत केली आहे. आमिरला यासंदर्भात पब्लिसिटी नकोय, म्हणून त्याने केलेल्या मदतीची फारशी माहिती समोर आलेली नाही.

  • यापूर्वीही अशी मदत केली

तसे पाहता आमिर पुर्वीपासूनच देणगी देत आला आहे. वृत्तानुसार, त्यांनी 2013 मध्ये 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात झळकलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबियांना मदत म्हणून 5 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले.  2014 मध्ये आमिरने मामी फिल्म फेस्टिव्हलला 11 लाख रुपये देऊन समर्थन केले होते. याव्यतिरिक्त, बिहार, उत्तराखंड (2013), (2017), आसाम (2017) आणि महाराष्ट्र (2019) मधील भीषण पूर स्थितीत 25-25 लाख रुपयांची मदत केली होती.

बातम्या आणखी आहेत...