आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:30 वर्षांपेक्षा करिअरमध्ये आमिर खानने केले 47 चित्रपट, वाचा अभिनेत्याचे 5 रंजक किस्से

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा आमिरचे काही रंजक किस्से -

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमिर खान 14 मार्च 2022 रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत आमिर खानने 47 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वाचा आमिरचे काही रंजक किस्से -

1. जेव्हा 'दंगल'साठी 21,000 पेक्षा जास्त मुलींनी दिली होती ऑडिशन
दंगलसाठी आमिर खानने 21 हजार मुलींचे ऑडिशन घेतले होते. कारण त्याला इंडस्ट्रीतून कोणाला कास्ट करायचे नव्हते. यानंतर आमिरने फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा ​​यांना दंगलसाठी कास्ट केले.

2. चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणे खऱ्या आयुष्यात नायिकेशी बोलला नाही
आमिर मनीषा कोईरालासोबत 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यादरम्यान तो सेटवर खूप विचित्र वागत होता. मनीषाशी तो अजिबात बोलत नव्हता, अलिप्त रहात होता. यामुळे अस्वस्थ होऊन मनीषा स्वत: त्याच्याकडे गेली आणि विचारले, 'तू माझ्याशी का बोलत नाहीस?' यावर आमिरने उत्तर दिले होते, 'स्क्रिप्टनुसार माझे पात्र तुझ्याशी बोलत नाही, त्यामुळे मी तुझ्याशी बोलत नाहीये.' चित्रपटात आमिर आणि मनीषाचे पात्र एकमेकांशी बोलत नाहीत.

3. 3 इडियट्समधील सीन रिअल वाटावा म्हणून आमिर प्यायला होता दारु
'3 इडियट्स' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक सीन शूट होणार होता, ज्यामध्ये आमिर, शर्मन आणि आर. माधवनला मद्यधुंद दिसायचे होते. हा सीन खरा वाटावा यासाठी आमिरने राजकुमार हिराणींनाला सल्ला दिला की आम्ही तिघेही थोडे थोडे दारु पितो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर, माधवन आणि शर्मन यांनी यावेळी मात्र खूप जास्त दारु प्यायली होती.

4. किस्सा 'लगान' चित्रपटाचा
केबीसी या शोमध्ये आमिरने सांगितले होते की, लगान चित्रपटात अमिताभ बच्चन यांना कॉमेंट्रीसाठी विचारण्यात आले होते. यावर बिग बी गमतीने म्हणाले होते की, आतापर्यंत त्यांनी ज्या चित्रपटांच्या बॅकग्राऊंडला आवाज दिला आहे ते सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्यानंतर आमिर म्हणाला होता की, तो धोका पत्करण्यास तयार आहे कारण चित्रपट करताना अनेक अडचणी आल्या आहेत आणि त्यावर त्याने मात केली आहे.

5. शर्यतीच्या मधोमध आमिर घरच्यांचे ऐकायला गेला
आपल्या शाळेच्या सुरुवातीच्या काळात आमिरने शर्यतीत भाग घेतला होता. त्यावेळी तो केवळ तीन वर्षांचा होता. घरातील सदस्यही आमिरला चिअर करण्यासाठी आले होते. शर्यत सुरू होताच घरातील मंडळी कम ऑन आमिर! कम ऑन आमिर! ओरडू लागले. चिमुकला आमिर घरचे त्याला बोलावत आहेत, असे समजून रेस सोडून त्यांच्याकडे धावत गेला आणि तो या स्पर्धेतून बाहेर पडला.

बातम्या आणखी आहेत...