आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमिर खानचे नाव अशा अभिनेत्यांच्या यादीत आहे जे एका वेळी एकाच प्रोजक्टवर काम करतात. मात्र यावेळी त्याच्या दोन चित्रपटांत मोठे अंतर पडले आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या अपयशानंतर तो पुढील चित्रपटाबाबत खूप सतर्क झाला होता, हे त्यामागचे कारण आहे. पुढील चित्रपट निवडण्यासाठी त्याने खूप वेळ घेतला. शेवटी तो हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चे अधिकृत रिमेक करण्यास तयार झाला. या चित्रपटासाठी त्याने खूप वेळ दिला. यात तो एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. पण त्याचा हा अवतार त्याच्या आधीच्या ‘पीके’ आणि ‘धूम 3’ या चित्रपटांतील भूमिकांशी साध्यर्म्य राखणारा आहे. आता माहिती अशी आहे, की दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांच्यासोबत आमिर एक नवीन चित्रपटाबाबत चर्चा करत आहे.
मल्टिपल स्टोरी आयडियावर आमिर आणि सिद्धार्थची चर्चा
सिद्धार्थ सध्या आमिरचा मुलगा जुनैद खानसोबत यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘महाराजा’ चित्रपट तयार करत आहेत. यादरम्यान सिद्धार्थ आणि आमिर यांनी अनेक बैठका घेऊन मल्टीपल स्टोरी आयडियावर चर्चा केली आहे. यातील एका चित्रपटाची कल्पना आमिरला आवडली आहे आणि त्याने यावर एक उत्कृष्ट स्क्रिप्ट तयार करा, असे सिद्धार्थ आणि त्याच्या टीमला सांगितले आहे. नियोजनानुसार सर्वकाही झाले तर पुढच्या वर्षीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. तथापि, आमिरजवळ गुलशन कुमार यांचे बायोपिक ‘मोगुल’ही आहे, त्याचे चित्रीकरण त्याला पुढील वर्षी सुरू करायचे होते.
‘लाल सिंह चड्ढा’च्या रिस्पॉन्सची आहे प्रतीक्षा
सिद्धार्थ यांच्या चित्रपटाशिवायही आमिरला को स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स’वर आधारित एका चित्रपटावर काम करायचे आहे. त्याची स्क्रिप्ट आणि चित्रपटाशी संबंधित महत्वाची कामे अंतिम झाली आहेत, मात्र आमिर सध्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या रिस्पॉन्सची प्रतीक्षा करत आहे. तथापि, ‘चॅम्पियन्स’चे चित्रीकरण सुरू करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. हा प्रोजेक्ट यंदा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये फ्लोअरवर येऊ शकतो. याचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ फेम आर. एस. प्रसन्ना करणार आहेत. आमिरला या चित्रपटाची संकल्पना खूप आवडली आहे. असे अशले तरी 11 ऑगस्ट रोजी ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित झाल्यानंतरच आमिर त्यावर काम सुरू करणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तो ‘चॅम्पियन्स’बाबत निर्णय घेईल.
सुपर स्टारला आहे एका वादग्रस्त वकिलाच्या बायोपिकचीही ऑफर
याशिवाय आमिर अन्य प्रोजेक्ट्सबाबतही चर्चा करत आहे. एका वादग्रस्त वकिलाच्या बायोपिकचीही त्याला ऑफर आहे. ‘मोगुल’ तर त्याच्या खात्यात आहेच. तसेच तो लवकरच हरियाणातील पंचकुलाला जाणार आहे. प्रत्यक्षात 12 जून म्हणजे रविवारी होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 च्या एका कार्यक्रमासाठी आमिरला आमंत्रित करण्यात आले आहे. आमिर तेथे एक सेलिब्रिटी गेस्ट न्हणून उपस्थित राहील. आमिर हरियानात जाण्याची ‘दंगल’नंतर ही पहिलीच वेळ आहे. 2016 मध्ये आमिरने ‘दंगल’च्या माध्यमातून गीता आणि बबिता फोगाटची कधीही न सांगितलेली गोष्ट आमिरने जगासमोर आणली होती. अलीकडेच आमिर आयपीएलचा अंतिम सामना होस्ट करताना दिसला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.