अचिव्हमेंट / आमिर खान-किरण राव यांच्या ‘पाणी फाउंडेशन’ला मिळाली ग्लोबल ओळख, प्रोजेक्टवर शॉर्ट फिल्मदेखील

  • या संस्थेची स्थापना आमिर, किरणसह रिना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनीदेखील केली आहे.

दिव्य मराठी

May 23,2020 11:56:00 AM IST

मुंबई. आमिर खान आणि किरण राव यांच्या ‘पाणी फाउंडेशन’ला अँड्रयू मिलिसनद्वारे जगातील सर्वांत मोठ्या पर्माकल्चर प्रोजेक्ट म्हणून ओळख मिळाली आहे. अंड्रयू मिलिसन, एक प्रसिद्ध इंटरनॅशनल पर्माकल्चर डिझायनर आणि ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीत एक प्रोफेसर आहेत.

अलीकडेच त्यांनी आमिरच्या पाणी फाउंडेशनबाबत आपल्या यूट्यूब चॅनलवर एक शॉर्ट फिल्मदेखील प्रदर्शित केली.

अँड्रयू यांनी वाॅटरशेड मॅनेजमेंटवर केलेले काम समजण्यासाठी महाराष्ट्रातील एका गावात दौरादेखील केला होता. अँड्रयू यांनी या प्रोजेक्टला जगातील सर्वांत मोठे पर्माकल्चर प्रोजेक्टचा दर्जा दिला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा या फाउंडेशनचा उद्देश आहे. या माध्यमातून गावातील लोकांना वॉटरशेड मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देण्यात आले. गावकऱ्यांचे गट तयार तयार करून काम सुरू केले. अगोदर संपूर्ण जलाशयाची पातळी वाढवण्यासाठी एक स्पिलवेची पातळी वाढवली त्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा पुन्हा वाढला. याच्या चांगल्या परिणामामुळे हे प्रोजेक्ट यशस्वी झाले.

या संस्थेची स्थापना आमिर, किरणसह रिना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनीदेखील केली आहे.

X