आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपट:अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही 'लाल सिंग चड्ढा', यापूर्वी आमिरने दिले हे 5 फ्लॉप चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरस्टार आमिर खानचा नुकताच रिलीज झालेला 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. रिलीज होताच या चित्रपटाला 3000 स्क्रीन्स मिळाल्या. पण, बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरीमुळे चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले आहेत. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 45.83 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट फ्लॉप होण्याची चिन्ह आहेत. आमिरचा चित्रपट अशा प्रकारे फ्लॉप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. चला जाणून घेऊया त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल:-

ठग्स ऑफ हिंदोस्तान​​​​​​​

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. देशभरात या चित्रपटाची खूप चर्चा झाली, पण बॉक्स ऑफिसवर तो काही खास कमाई करू शकला नाही. हा चित्रपट एकूण 310 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता, परंतु देशभरात केवळ 176.43 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात आमिर खानसोबत अमिताभ बच्चन, कतरिना कैफ सारखे कलाकार होते. हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला होता.

मंगल पांडे - द रायझिंग​​​​​​​​​​​​​​

'मंगल पांडे- द रायझिंग' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. हा चित्रपट सुमारे 37 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, परंतु त्याने केवळ 27.86 कोटींची कमाई केली. हा चित्रपट आमिरच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप ठरला होता.

मेला

2000 मध्ये आलेला 'मेला' हा चित्रपट आमिर खानच्या मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. हा चित्रपट एकूण 18 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, मात्र त्याने एकूण 15.19 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात आमिरसोबत ट्विंकल खन्ना, फैजल खान (आमिरचा भाऊ) देखील झळकले होते.

1947 अर्थ

हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 3.80 कोटी होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात आमिरसोबत नंदिता दास आणि राहुल खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

आतंक ही आतंक​​​​​​​​​​​​​​

'आंतक ही आतंक' हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 'द गॉडफादर'पासून प्रेरित होता. 2.5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 2.55 कोटींचीच कमाई केली होती. आमिरसोबत या चित्रपटात रजनीकांत, जुही चावला आणि अर्चना जोगळेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...