आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडच्या सुपरहिट 'लगान' या चित्रपटात केसरिया ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री परवीना बानो सध्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करत आहे. 2011 मध्ये तिला ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली आणि उपचारांमध्ये तिची सर्व बचत खर्च झाली. परवीनाने सांगितल्यानुसार, ती तिची मुलगी आणि धाकट्या बहिणीसोबत राहते. पतीपासून विभक्त झाल्यानंतर घरात कमावती ती एकमेवर सदस्य होती. लहान-मोठ्या भूमिका साकारुन घराचा खर्च उचलत असे, असे तिने सांगितले आहे. परवीनाने सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे.
ब्रेन स्ट्रोकनंतर अर्धांगवायू झाला
परवीनाला 2011 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्या आजारामध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला. आता तिच्याकडे पुढील उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे तिची स्थिती गंभीर होत चालली आहे. मी आता माझ्या घरी माझी मुलगी आणि छोट्या बहिणीसोबत राहत आहे. पतीशी वेगळे झाल्यापासून मला कित्येक संकटांना सामोरे जावं लागले. त्याचा सामना करत मला माझ्या आजारावर इलाज करावा लागला, असे ती म्हणाली. 42 वर्षीय परवीनाने पुढे सांगितले, की 2011 मध्ये ब्रेन स्ट्रोकनंतर तिला अर्धांगवायू झाला. तेव्हापासून सतत प्रकृती ढासळत चालली आहे.
CINTA ने केली मदत
परवीन पुढे सांगते, मी उपचारावर इतके पैसे खर्च केले आहेत की त्याचा हिशोब नाही. तेव्हापासून मी कामाशिवाय घरी आहे. माझी बहीण इंडस्ट्रीत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत असे. ती कसा तरी कुटुंबाचा खर्च चालवत होती, पण लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे काम प्रभावित झाले, ज्यामुळे तिची नोकरी गेली. आता आमच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नाही. मी मदतीसाठी अनेक लोकांकडे गेले, पण प्रतिसाद मिळाला नाही. CINTA च्या लोकांनी रेशन पाठवले आहे. राजकमल यांनीही दोन वेळा रेशन पाठवले आहे. मी अजूनही उपचार घेत आहे. मला दर आठवड्याला औषधांसाठी 1800 रुपये मिळतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.