आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चांगली बातमी:आमिर खानची आई झीनत यांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह, आमिरने लिहिले- प्रार्थनांसाठी तुमच्या सर्वांचे आभार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अम्मीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अभिनेता आमिर खानची आई झीनत हुसेन यांचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी आमिरच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्याने ही बातमी दिली. घरातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

  • आमिरने मानले चाहत्यांचे आभार

  आमिरने ट्विटमध्ये लिहिले- मला सर्वात मोठा दिलासा म्हणजे अम्मीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी खूप धन्यवाद.  

  • आमिरने बीएमसीचे मानले होते आभार

यापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये आमिर खानने बीएमसीचे आभार मानले होते. पण त्याने त्याच्या घरातील एकुण किती कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली याचा आकडा सांगितला नव्हता. हा आकडा एकापेक्षा अधिक असल्याचा उल्लेख मात्र त्याने केला. सर्वांना क्वारंटाइन केले गेले आहे. आमिरने बीएसीकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय मदतीबद्दल आभार मानले. तसेच कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांनाही त्याने धन्यवाद दिले.   

  • 15 जुलैपासून शूटिंग सुरू होणार होती

आमिर लॉकडाउनपूर्वी हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंपच्या रिमेकसाठी शूट करत होता. अनलॉक केल्यानंतर, आम्ही 15 जुलैपासून शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत होतो. परंतु घरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत 15 जुलैचे शूटिंग पुढे ढकण्यात आल्याचे आमिरने सांगितले. या चित्रपटात आमिरबरोबर करीना कपूर आणि मोना सिंगही दिसणार आहेत.

0