आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या आगामी चित्रपटाचा सोशल मीडियावर निषेध:शाहरुख-रणवीरचे चित्रपटही झाले बायकॉट, तरीही ठरले हिट

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर नेटिझन्स चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. #BoycottLaalSinghCaddha ट्विटरवर ट्रेंड करत आहे. आमिर आपल्या चित्रपटांमधून हिंदू संस्कृतीचा अपमान करतो, असे युजर्सचे मत आहे.

एखादा चित्रपट बॉयकॉटसह ट्रेंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही शाहरुख खान, रणवीर सिंहसह अनेक सेलिब्रिटींच्या चित्रपटांवर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.

माय नेम इज खान

शाहरुख खानने आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या खरेदीवर भाष्य केले होते, त्यानंतर शिवसेनेने अभिनेत्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या चित्रपटात शाहरुखशिवाय काजोलही मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 85 कोटींची कमाई केली होती.

पद्मावत​​​​​​​

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. राजपूत करणी सेनेने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर राजकीय नेत्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची जोरदार मागणी केली होती. चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्मात्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. इतक्या वादानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 585 कोटींचा गल्ला जमवला होता.

गोलियों की रासलीला - रामलीला

​​​​

या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते आणि चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. सुरुवातीला या चित्रपटाचे शीर्षक रामलीला होते, ज्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. या चित्रपटातून हिंदू देवी-देवतांचा अपमान होत असल्याचे आंदोलकांचे मत होते. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचे आदेश दिले, त्यानंतर निर्मात्यांनी त्याचे शीर्षक बदलून 'गोलियों की रासलीला- रामलीला' केले. चित्रपटाने चांगली कामगिरी केली आणि बॉक्स ऑफिसवर 116.33 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दंगल

आमिर खानच्या दंगल या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार घडला कारण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आमिरची दुसरी पत्नी (आता घटस्फोट झाला आहे) किरण राव हिने देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते. मात्र तिच्या या वक्तव्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला नव्हता. हा चित्रपट हिट ठरला आणि बॉक्स ऑफिसवर 387.38 कोटी रुपयांची कमाई केली होती.

पीके​​​​​​​​​​​​​​

या यादीत आमिर खानचा आणखी एक चित्रपट 'पीके'च्या नावाचाही उल्लेख आहे. हिंदू देवांचा फोटो वापरण्यासह अनेक दृश्यांमुळे चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागला होता. यासोबतच निर्मात्यांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि नग्नतेला प्रोत्साहन दिल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. विरोधानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 340.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.

बातम्या आणखी आहेत...