आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालसिंग चड्ढा:कोरोनातून बरे होताच कामावर परतला आमिर खान, लडाखमध्ये पूर्ण करणार'लालसिंग चड्ढा'चे अंतिम शेड्यूल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखमध्ये चित्रपटाचे अंतिम शेड्यूल आमिर पूर्ण करणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानला काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर आता आमिर पुन्हा कामावरपरतला आहे. आगामी लालसिंग चड्ढा या चित्रपटाचे उर्वरीत चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी आमिर लडाख येथे दाखल झाला आहे. येथे चित्रपटाचे अंतिम शेड्यूल आमिर पूर्ण करणार आहे. नुकतेच त्याचे लडाखला पोहोचल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, लालसिंग चड्ढा चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण लडाखमध्ये होत आहे. येथे आमिर 45 दिवस चित्रीकरण करणार आहे. या चित्रपटात विजय सेतुपती देखील आमिर खानसह एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता, मात्र आता त्याची जागा नाग चैतन्यने घेतली आहे. आता लवकरच नाग चैतन्य देखील शूटिंग पूर्ण करण्यासाठी लडाखला पोहोचणार आहे.

कोरोनामुळे बदलण्यात आले लोकेशन
आमिर खानच्या या चित्रपटात कारगिल वॉरचा सीन दाखवला जाणार आहे, या सीनचे चित्रीकरण पहिले परदेशी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र लॉकडाउन आणि कोरोना महामारीमुळे परदेशात शुटिंग करणे शक्य झाले नाही. आता चित्रपटातील युद्धाचे दृश्य चित्रीत करण्यासाठी लडाखमध्येच कारगिलचा सेट तयार करण्यात आला आहे.

लालसिंग चड्ढा' हा 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे
आमिर खान आणि करीना कपूर स्टारर लालसिंग चड्ढा हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक आहे. त्याचे दिग्दर्शन रॉबर्ट जमॅकिस यांनी केले होते, तर
पटकथा विन्सटन ग्रूमने लिहिली होती. टॉम हँक्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. 'लाल सिंह चड्ढा'च्या कथेनुसार ही व्यक्तिरेखा 30 वर्षात देशातील सुमारे 100 शहरांमध्ये फिरते आणि सोबतच सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातही महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करते. हा चित्रपट 2020 मध्ये ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट यावर्षीच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात
आला आहे.

बातम्या आणखी आहेत...