आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आमिर खानने 'द कश्मीर फाइल्स'बद्दल बोलताना हा चित्रपट नक्कीच पाहणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहावा, असे आवाहनही त्याने केले आहे. आमिर खान राजधानी दिल्लीत राजधानीत एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या चाहत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होता.
आमिर बघणार 'द कश्मीर फाइल्स'
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहिला का?, असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला. याचे उत्तर देताना आमिर म्हणाला, "मी कश्मीर फाइल्स नक्कीच पाहीन, कारण या चित्रपटात आपल्या इतिहासाचा असा एक भाग आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो. जे काश्मिरी पंडितांसोबत घडले ते नक्कीच खूप क्लेशदायी आहे आणि या विषयावर बनलेला चित्रपट प्रत्येक भारतीयाने पाहिला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतो तेव्हा त्याचे काय होते?"
चित्रपटाचे यश पाहून आमिर आनंदी
आमिर पुढे म्हणाला, "या चित्रपटाने मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे. हा चित्रपट मी नक्कीच पाहीन आणि हा चित्रपट यशस्वी होताना पाहून मला आनंद होत आहे."
चित्रपट बघण्यास प्रेक्षक उत्सुक
'द कश्मीर फाइल्स' हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट आहे ज्याचा निर्मिती खर्च केवळ 12 कोटी असून त्याच्या व्यवसायात मात्र दररोज 10 ते 20% पर्यंतची वाढ दिसून येतेय. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी या चित्रपटाला देशभरात केवळ 600 स्क्रीन्स मिळाल्या. नंतर, प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची आवड बघता पहिल्या आठवड्यात स्क्रीन काउंट 600 वरून 2,000 पर्यंत वाढवण्यात आला. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाचा स्क्रीन काउंट 4,000 हून अधिक झाला आहे.
या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतोय
काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणा-या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावाडी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, पुनीत इस्सार हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची देशभरात चर्चा होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.