आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस्टर परफेक्शनिस्टचा निर्णय:आमिर खान 'महाभारत' बनवणार नाही, एका चित्रपटामुळे कमीतकमी 3 चित्रपटांचे नुकसान होण्याची वर्तवली शक्यता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व बाबींचा विचार करून चित्रपटातून हात मागे घेतला

अभिनेता आमिर खान मागील 5-6 वर्षांपासून 'महाभारता'वर एक भव्य चित्रपट बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र मागील वर्षी आमिर हा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यासाठी नव्हे तर OTT वर आणण्याची तयारी करत असल्याचे म्हटले गेले होते. परंतु, ताज्या वृत्तानुसार, आमिरने आता हा प्रोजेक्ट बनवण्याची योजना रद्द केली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. विशेषतः या महाकाव्यावर चित्रपट बनवण्याची ही योग्य वेळ नसल्याचे आमिरचे मत असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व बाबींचा विचार करून चित्रपटातून हात मागे घेतला

स्पॉटबॉयने आमिरच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'सर्व चांगल्या आणि वाईट बाबींचा विचार केल्यावर आमिर खानने 'महाभारत' हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट वादग्रस्त ठरु शकतो. इतकेच नाही तर ज्या मोठ्या प्रमाणावर हा चित्रपट बनवण्याची योजना आखली जात होती ती व्यावसायिकदृष्ट्या व्यवहारिक नव्हती. इतकेच नाही तर महाभारत या चित्रपटासाठी 5 वर्षे देणे म्हणजे कमीतकमी तीन चित्रपट गमावणे हे आणखी एक मुख्य कारण आहे. त्यामुळे आमिरने हा चित्रपट डबाबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.' संपूर्ण प्रकरणात आमिरकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सध्या 'लालसिंग चड्ढा'मध्ये बिझी आहे आमिर

आमि खान सध्या त्याचा आगामी 'लालसिंग चड्ढा' हा चित्रपट पूर्ण करण्याच्या तयारीला लागला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 1994 च्या सुपरहिट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. दोन वर्षांच्या गॅपनंतर आमिर या चित्रवटातून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. तो अखेरचा 2018 मध्ये आलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...