आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एका स्टार किडचे पदार्पण:आमिर खानचा मुलगा जुनैद करतोय बी टाऊनमध्ये डेब्यू, लॉकडाउननंतर चित्रीत झालेला पहिला चित्रपट ठरेल ‘महाराजा’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दररोज केवळ आठ तास बायो-बबलमध्ये होईल चित्रीकरण

अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. ‘महाराजा’ हे त्याच्या चित्रपटाचे नाव असून हा लाॅकडाउननंतर चित्रीत झालेला पहिला चित्रपट ठरेल. आदित्य चोप्रांच्या बॅनरमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले अाहे. त्यांनी मंगळवारपासून मुंबईनजीक मराेळ येथे तयार केलेल्या सेटवर शूटिंग सुरू केले आहे.

दररोज केवळ आठ तास बायो-बबलमध्ये होईल चित्रीकरण
महाराष्ट्रात अनलॉक झाल्यानंतर चित्रीकरणासाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. नवीन SOP नुसार बायो बबलमध्ये शूटिंग करावे लागणार आहे. शिवाय चित्रीकरणासाठी आठ तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. यशराज फिल्म्सने सरकारच्या गाइडलाइन लक्षात घेता चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमीत कमी लोकांच्या टीमसह शूटिंग सुरु
निर्माते कमीत कमी स्टाफसह ते शूटिंग पूर्ण करण्याच्या विचारात आहेत. प्राॅडक्शन टीम, मुख्य कलाकारांसह फक्त 25 जणांना त्यात सहभागी हाेण्यास सांगण्यात आले आहे. चित्रीकरणापूर्वी कलाकार आणि क्रू मेंबर्सना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

काय आहे महाराजाची कहाणी
महाराजा हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. महाराजा लिबेल यांच्या खटल्यावर चित्रपटाची कथा अाधारित अाहे. 1862 मध्ये एका धार्मिक प्रमुखाने वृत्तपत्राविराेधात दावा दाखल केला. कारण त्यात त्याने महिला भक्तांच्या लैंगिक शाेषणाचा पर्दाफाश केला हाेता. पत्रकार करसनदास मुलजीच्या भूमिकेत जुनैद दिसेल. ‘अर्जुन रेड्डी’ फेम शालिनी पांडे व शर्वरी वाघ या चित्रपटात जुनैदसोबत दिसणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारीत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार होते, मात्र लॉकडाउनमुळे ते पोस्टपोन करावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...