आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:श्रीदेवीची मुलगी आमिरच्या मुलासोबत झळकणार, तमिळ ब्लॉकबस्टर 'लव्ह टुडे'च्या रिमेकमध्ये दिसणार जुनैद-खुशी

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या इंडस्ट्रीत अर्धा डझन रिमेक चित्रपटांवर काम सुरू आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर एकत्र दिसणार आहेत. हा गेल्या वर्षी आलेल्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट 'लव्ह टुडे'चा रिमेक असेल. 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'लाल सिंग चढ्ढा' यांसारखे चित्रपट दिग्दर्शित करणारs अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

तरुण कपलच्या भूमिकेत दिसणार

या वर्षाच्या उत्तरार्धात चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटासाठी निर्मात्यांनी मुख्य कलाकारांना अंतिम रूप दिले आहे. जुनैद आणि खुशी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या नावाची चर्चा होती, मात्र आता दोघांनीही चित्रपट साइन केल्याचे ऐकिवात आहे. दोघेही या चित्रपटात तरुण कपलच्या भूमिकेत दिसणार आहेत.

जुलैपर्यंत फ्लोरवर जाईल हा चित्रपट

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लव्ह टुडे' या तमिळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना मुख्य भूमिकेत होते. स्पोर्टिंग स्टार कास्टमध्ये सत्यराज, योगी बाबू आणि राधिका सरथकुमार यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. आणि रिमेकसाठी, उर्वरित स्टार कास्ट पुढील महिन्यापर्यंत फायनल होईल. दिग्दर्शक अद्वैत जुलैपर्यंत हा रिमेक फ्लोअरवर आणण्याचा विचार करत आहेत.

सध्या डेब्यू प्रोजेक्टचे शूटिंग सुरू

जुनैद आणि खुशी या दोघांचा हा दुसरा चित्रपट असेल. दोघेही त्यांच्या डेब्यू प्रोजेक्टवर काम करत आहेत. जुनैद यशराज बॅनरच्या थ्रिलर-ड्रामा 'महाराज'मध्ये काम करत आहे. तर खुशी झोया अख्तरच्या 'द आर्चिज'मधून पदार्पण करणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील दिसणार आहे. खुशीचा हा पहिला प्रोजेक्ट असला तरी तो OTT वर रिलीज होणार आहे. अशा स्थितीत 'लव्ह टुडे'चा रिमेक हा खुशीचा पहिलाच थिएटरमध्ये पदार्पण असेल.