आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण भारतीय चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेवर अलीकडेच आमिर खानला प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना आमिरने शाहरुखचे आभार मानले. कारण शाहरुखमुळेच त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचा 'KGF 2' सोबत होणार संघर्ष टळला.
आमिर म्हणाला की, शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीने लाल सिंग चड्ढाचे व्हीएफएक्स बनवण्यास उशीर केला. परंतु याचा आम्हाला फायदाच झाला. यामुळे आमच्या चित्रपटाचा 'केजीएफ 2' शी संघर्ष टळला. आमिरच्या मते हिंदी प्रेक्षकांमध्ये KGF 2 बद्दल प्रचंड उत्साह होता, त्यामुळे त्याचा चित्रपट नंतर प्रदर्शित झाला हे चांगले घडले.
देशाच्या प्रत्येक भागात चांगला कंटेंट पाहायला मिळत आहे
'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या तेलुगु ट्रेलर लाँच वेळी आमिरने ही गोष्ट उघड केली. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेबद्दल विचारले असता त्याने पुष्पा, बाहुबली आणि आरआरआर यांसारख्या चित्रपटांचे कौतुक केले. आमिर म्हणाला की, आता देशाच्या प्रत्येक भागात उत्तम कंटेंट पाहिला जात आहे हे पाहून खरोखरच आनंद होतोय.
नशीबवान आहे की, KGF शी टक्कर झाली नाही: आमिर
आमिर म्हणाला, 'मला आठवतंय जेव्हा KGF 2 रिलीज होणार होता, तेव्हा माझ्या काही जुन्या मित्रांमध्ये आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. लाल सिंग चड्ढा देखील त्याच दिवशी रिलीज होणार होता, पण आमचे सुदैव होते की, रेड चिलीज एंटरटेन्मेंटने चित्रपटाच्या VFX वर थोडा अधिक वेळ घेतला. त्यामुळे आम्ही वाचलो नाहीतर आमचा चित्रपट KGF 2 सोबत रिलीज झाला असता.'
रेड चिलीजचा स्वतःचा व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ आहे
'लाल सिंह चढ्ढा'चे VFX काम शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीजकडे होते. रेड चिलीज आणि लाल सिंग चढ्ढा यांच्यातील कोलॅबरेशनची घोषणा खुद्द शाहरुखने त्याच्या सोशल मीडियाद्वारे केली होती. रेड चिलीजचा व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ आहे जो चित्रपटांसाठी VFX चे काम करतो.
शाहरुखने 2006 मध्ये त्याचा चित्रपट व्यवसाय पुढे नेण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्सच्या जगात प्रवेश केला. त्याने मुंबईत एक अत्यंत प्रगत VFX स्टुडिओ उघडला. या VFX स्टुडिओने बॉलिवूडला 'चक दे इंडिया', 'रा.वन', 'क्रिश 3', 'फिल्लौरी' आणि 'झिरो' सारखे चित्रपट दिले आहेत.
180 कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता 'लाल सिंह चड्ढा'
मात्र, सिंगल रिलीज असूनही 'लाल सिंग चड्ढा' प्रेक्षकांना भावला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. हा चित्रपट 1994 चा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक होता.
सुमारे 180 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर केवळ 130 कोटींची कमाई केली. या चित्रपटात आमिर खानशिवाय करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.