आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा लांबणीवर पडला 'लाल सिंग चड्ढा':आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा'ची रिलीज डेट पुढे सरकली, आता 14 एप्रिलला नव्हे 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.

आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. आता हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, 'लाल सिंग चड्ढा 14 एप्रिलऐवजी 11 ऑगस्टला रिलीज होईल. आमचा चित्रपट अद्याप तयार झाला नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे,' असे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान आणि नागा चैतन्य देखील दिसणार आहेत.

14 एप्रिल 2020 ठरली होती प्रदर्शनाची तारीख
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी एप्रिलमधील 14 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. आमिर खान प्रॉडक्शनच्या वतीने ही माहिती देण्यात आली होती. प्रसिद्ध हॉलिवूडपट 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. टॉमला त्या भूमिकेसाठी ऑस्करदेखील मिळाले होते. आता बॉलिवूडमध्ये या चित्रपटाचा रिमेक येणार असून गेल्या तीन वर्षांपासून आमिरचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीते दिली आहेत. तर चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि Viacom18 स्टुडिओज यांनी केली आहे. 14 एप्रिल 2022 पुर्वी 11 फेब्रुवारी 2022 रोजी ही चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली होती. पण आता हा चित्रपट ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...