आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्टर परफेक्शनिस्टचे दुसरे लग्न मोडले:आमिर खानने पत्नी किरण रावला दिला घटस्फोट, लग्नाच्या 15 वर्षांनी परस्पर सहमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिर आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्न मोडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी 28 डिसेंबर 2005 रोजी लग्न केले होते. लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

आमिर आणि किरण यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

दोघांनी लिहिले, '15 वर्षे एकत्र घालवताना आम्ही आनंदाने प्रत्येक क्षण जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत - जो पती-पत्नी या नात्याचा नसेल, परंतु तो को-पॅरेंट आणि एकमेकांसाठी कुटुंब म्हणून असेल. आम्ही काही काळापूर्वी विभक्त होण्याचे ठरवले आणि आता आम्ही या वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझादचे को-पॅरेंट असून आणि एकत्र त्याचे संगोपन करु.

आम्ही दोघेही चित्रपट आणि आमच्या पानी फाउंडेशन व्यतिरिक्त आमच्या आवडीच्या सर्व प्रोजेक्टवर एकत्र काम करत राहू. याकाळात आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबाचे मनापासून आभार. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो. आमच्या हितचिंतकांनीसुद्धा आमच्या घटस्फोटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहावे अशी आमची अपेक्षा आहे.

आमिर आणि किरण यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
आमिर आणि किरण यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

'लगान'च्या सेटवर झाली होती पहिली भेट
एका मुलाखतीत आमिरने सांगितले होते की, किरणबरोबर त्याची पहिली भेट 'लगान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. किरण दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांची असिस्टंट डायरेक्टर होती.

आमिरने सांगितले होते - 'एक दिवस किरणचा फोन आला आणि तिच्याशी 30 मिनिटे माझे बोलणे झाले. किरणशी झालेल्या संभाषणानंतर मी खूप आनंदी झालो. मी माझ्या आतला आनंद अनुभवत होतो. त्या फोन कॉलनंतर मी किरणला डेट करण्यास सुरुवात केली. आम्ही 1-2 वर्षे एकमेकांना डेट केले आणि याकाळात आम्ही एकत्रदेखील राहिलो. याकाळात मला कळले की, मी तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. तिच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एक कणखर स्त्री आहे. मग आम्ही आमच्या नात्याला नाव दिले आणि लग्न केले.'

सरोगेसीच्या माध्यमातून झाला मुलगा आझादचा जन्म
किरण आणि आमिर यांना एक मुलगा असून आझाद हे त्याचे नाव आहे. तो आता दहा वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. किरणला गर्भधारणेत अडचण आल्यामुळे त्यांनी सरोगसीचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये आझादचा जन्म झाला.

रीना दत्ता आणि आमिरचे पहिले लग्न 16 वर्षे टिकले होते.
रीना दत्ता आणि आमिरचे पहिले लग्न 16 वर्षे टिकले होते.

2002 मध्ये तुटले होते आमिरचे पहिले लग्न

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनी लग्न केले होते. 18 एप्रिल 1986 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले आणि त्यानंतर 16 वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमिर आणि रीना यांना मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा आहेत. दोघेही रीनासोबत राहतात.

बातम्या आणखी आहेत...