आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता आमिर खान त्याच्या आगामी 'लालासिंग चड्ढा' या चित्रपटातील युद्धाचा सिक्वेन्स लडाखमध्ये चित्रीत करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यासाठी आमिर लडाखमध्ये सध्या लोकेशनच्या शोधात आहे. लडाखमध्ये चित्रपटाचे शेवटचे शेड्युल असेल.
आता ताज्या वृत्तानुसार, आमिर केवळ चार सदस्यांच्या टीमच्या उपस्थितीत हे वेळापत्रक पूर्ण करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेटवर कडक प्रोटोकॉल पाळला जावा अशी आमिरची इच्छा आहे. त्यामुळेच त्याने शूटिंगची जबाबदारी केवळ चार सदस्यांवर सोपवली आहे. हे चार जण युद्धाच्या सिक्वेन्सच्या शूटिंगसाठी आमिरसोबत लडाखला रवाना झाले होते.
यापूर्वी हा सिक्वेन्स मुंबईत चित्रीत केला जाणार होता. मात्र नंतर रिअल लोकेशनवर चित्रीत केल्यानंतरच वॉर सिक्वेन्स मोठ्या प्रमाणावर दिसू शकेल, असे चित्रपटाच्या टीमला वाटले.
नागा चैतन्य ‘लालसिंह चड्ढा’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार
तेलुगू सुपरस्टार नागा चैतन्य आमिर खानच्या ‘लालसिंह चड्ढा’मधून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. सूत्रानुसार, नागा लवकरच आमिरसोबत लडाखमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हे शूटिंग सुमारे 45 दिवस चालणार आहे. त्यासाठी आमिर चित्रपटाच्या टीमसोबत आधीपासून लडाखला रवाना झाला आहे. सूत्रानुसार, या भूमिकेसाठी आधी विजय सेतुपतीला घेण्यात आले होते. मात्र काही कारणामुळे सेतुपतीने चित्रपट करण्यास नकार दिला. नागा आणि आमिर चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण अॅक्शन आणि युद्धाच्या दृश्यांचे चित्रीकरण करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.