आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खानने दिला होता भावाला सल्ला:फैजल खानचा खुलासा, 'मेला' फ्लॉप झाल्यानंतर भाऊ आमिर म्हणाला होता - 'तू चांगला अभिनेता नाहीस, काहीतरी दुसरं काम शोध'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फैजल आता बऱ्याच काळानंतर 'फॅक्टरी' या चित्रपटातून कमबॅक करत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या त्याचा आगामी 'फॅक्टरी' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजलने आमिरबद्दल एक खुलासा केला. 2000 मध्ये 'मेला' हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आमिरने फैजलला अभिनय सोडून दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला होता.

फैजलने सांगितले, 'जेव्हा 'मेला' हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा मी कामासाठी सगळीकडे फिरत होतो. पण आमिरने माझी कोणतीही मदत केली नाही. उलट तो मला फोन करून म्हणाला की, फैजल तू एक चांगला अभिनेता नाहीस. आता 'मेला' पण फ्लॉप झाला. आता काय करायचं? तू काहीतरी दुसरं शोध.'

फैजल पुढे म्हणाला, ज्याला मी अभिनेता म्हणून योग्य वाटत नाही तो माझी मदत का करेल? एक भाऊ म्हणून मी नेहमीच आमिरला धीर देत आलोय. पण त्याने कधीही तसे केले नाही. पण काही काळ आमिरच्या प्रॉडक्शन कंपनीत स्क्रिप्ट वाचन करण्याचे काम केल्याचे फैजलने सांगितले.

'मेला'मध्ये एकत्र दिसले होते आमिर-फैजल
फैजलने आमिरसोबत 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेला' या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये फैजलने काम केले, पण त्याला यश मिळाले नाही. असे म्हटले जाते की, यामुळे त्याने त्याचे मानसिक संतुलन गमावले आणि एक दिवस कुणालाही न सांगता तो घरातून निघून देला. मात्र, काही दिवसांनंतर फैजल घरी परतला. परतल्यानंतर त्याने आमिरवर अनेक गंभीर आरोप केले होते.

त्याने म्हटले होते की, आमिरने त्याला घरात कैद केले होते. त्याला मानसिक आजार असल्याचे सांगत औषधे घेण्यासही भाग पाडले होते. इतकेच नाही फैजलने आमिरवर त्याची संपत्ती बळकावल्याचा आरोपही केला होता.

2008 मध्ये एका मुलाखतीत फैजल म्हणाला होता- "खरं सांगायचं तर, मी कधीच आजारी नव्हतो. माझ्याबद्दल जे काही सांगितले गेले, ते माझ्या मोठ्या भावाने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पसरवले होते. माझे अपहरण करण्यात आले होते. मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मला नको ती औषधे देण्यात आली होती.' फैजल आता बऱ्याच काळानंतर 'फॅक्टरी' या चित्रपटातून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचा तो लेखक आणि दिग्दर्शक आहे.

बातम्या आणखी आहेत...