आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्री खातर:'लाल सिंग चड्ढा'चे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवून मित्राच्या 'कोई जाने ना'  चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगसाठी पोहोचला आमिर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमिर एलीबरोबर थिरकताना दिसणार

अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावर थांबवले आहे. वास्तविक, यामागील कारण म्हणजे त्याची मैत्री आहे. अमीन हाजीच्या आगामी कोई जाने ना या चित्रपटातील खास गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी आमिरने लाल सिंग चड्ढाचे चित्रीकरण थांबवले आहे. आमिरचा अतिशय जवळचा मित्र अमीन दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे आणि त्याचे चित्रीकरण सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. यामुळेच आमिरने आपल्या चित्रपटापेक्षा मैत्रीला प्राधान्य दिले आहे.

आमिर एलीबरोबर थिरकताना दिसणार
डीएनएच्या वृत्तानुसार, अमीन कोई जाने ना या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात येत आहे. आपल्या मित्राने चित्रपटात स्पेशल अपिअरन्स द्यावा अशी अमीन यांची इच्छा होती. आमिरने आपल्या मित्राच्या विनंतीला मान दिला आणि आता या चित्रपटात आमिरचा स्पेशल अपिअरन्स असणार आहे. पुढील 5 दिवस आमिर जयपूर स्टुडिओमध्ये एली अवरामसोबत गाण्याचे शूट करणार आहे. यासाठी एक खास सेट बनवण्यात आला आहे. हे गाणे तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले असून बॉस्को-सीझर याचे कोरिओग्राफर आहेत.

'कोई जाने ना' या चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि अमीन हाजीसह सुधीर दायमा, संतोष बेरजदार, शॅरलेट हाजी
'कोई जाने ना' या चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि अमीन हाजीसह सुधीर दायमा, संतोष बेरजदार, शॅरलेट हाजी

20 वर्षे जुनी आहे मैत्री
अमीन आणि आमिरची मैत्री 20 वर्षे जुनी आहे. अमीनने आमिर खानच्या लगान आणि मंगल पांडे या चित्रपटातही काम केले होते. अमीनच्या 'कोई जाने ना' या चित्रपटात कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...