आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरने थिएटरमध्ये पाहिला चित्रपट:मुलगी इरासह आमिर खानने चित्रपटगृहात जाऊन पाहिला 'सूरज पे मंगल भारी', म्हणाला - दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्याचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बल आठ महिन्यांनंतर चित्रपटगृहांमध्ये 'सूरज पे मंगल भारी' हा पहिला चित्रपट रिलीज झाला आहे.

कोरोना महामारीमुळे देशभरातील चित्रपटगृहे बंद पडली होती. लॉकडाऊन संपल्यानंतरही थिएटर्स उघडलेली नव्हती, मात्र आता हळूहळू थिएटर्स उघडली जात आहेत. तब्बल आठ महिन्यांनंतर चित्रपटगृहांमध्ये 'सूरज पे मंगल भारी' हा पहिला चित्रपट रिलीज झाला आहे. बॉलिवू़डचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान दीर्घ काळानंतर मुलगी इरासह हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचला. आमिरने मंगळवारी मुंबईतील जुहू भागातील पीव्हीआर थिएटरमध्ये या चित्रपटाचा आनंद लुटला.

आमिरने स्वतः एक ट्विट करुन 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये जात असल्याची माहिती दिली. 'दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्याचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे', अशा आशयाचे ट्विट त्याने केले.

या चित्रपटात आयटम नंबर करणारी अभिनेत्री करिश्मा तन्नाने आमिरचे ट्विट रिट्विट करत त्याला याबद्दल धन्यवाद दिले आहेत. 'धन्यवाद आमिर सर', असे ट्विट करिश्माने केले.

पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ आणि मनोज वाजपेयी यांचा हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. रविवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार देशभरात 800 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. कोरोना महामारीचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोना नसताना हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर चित्रपटाने जास्त कमाई केली असती, असे म्हटले जात आहे.

या चित्रपटात मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. तर सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, सीमा पाहवा, अन्नू कपूर आणि विजय राज या दिग्गजांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...