आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅपअप:आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर 'लाल सिंह चड्ढा'चे चित्रीकरण पूर्ण, देशभरातील विविध 100 ठिकाणी झाले चित्रीकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'लाल सिंह चड्ढा' येत्या नाताळात प्रदर्शित होणार आहे.

अकॅडमी पुरस्कार विजेता 'फॉरेस्ट गंप'चे अधिकृत हिंदी रिमेक असलेला 'लाल सिंह चड्ढा' या वर्षी नाताळात प्रदर्शित होत आहे. मागील काही वर्षांमध्ये, आमिर खान प्रॉडक्शन्सने भारतीय प्रेक्षकांना अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत ज्यामध्ये 'लगान', 'तारे जमीन पर' आणि 'दंगल'सारख्या चित्रपटांनंतर, आता बहुप्रतीक्षित 'लाल सिंह चड्ढा' सामील होत आहे.

'लाल सिंह चड्ढा' हा कॉमेडी-ड्रामा आपल्या घोषणेपासूनच अनेक कारणाने चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट सहा अकॅडमी पुरस्कार विजेता राहिलेला 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक आहे. आमिर खान यात मुख्य भूमिका साकारत आहे. तर त्याच्यासह करीना कपूरही महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

'लाल सिंह चड्ढा'चे चित्रिकरण मागील वर्षी सुरु करण्यात आले होते आणि त्याला देशभरातील विविध 100 स्थानांवर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाचे शूटिंग नुकतेच मुंबईमध्ये पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने संपूर्ण कास्ट आणि क्रूने सेटवर एकत्र येऊन 'आतापर्यंतच्या सर्वात लक्षवेधी चित्रपटाचे पूर्ण होणे' साजरे केले.

आमिर खान प्रॉडक्शन्स, वायकॉम 18 स्टूडियो आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून अद्वैत चंदन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...