आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपोर्ट्समध्ये दावा:आमिर खानची मुलगी इरा ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा पडली प्रेमात, 6 महिन्यांपासून वडिलांच्या फिटनेस कोचला करतेय डेट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा महिन्यांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा पुन्हा एकदा प्रेमात पडली. मीडिया रिपोर्टनुसार इरा तिचे वडील आमिरचा फिटनेस कोच नुपूर शिखरे याला डेट करत आहे. मागील सहा महिन्यांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

लॉकडाउन दरम्यान इराने आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याचे ठरवले. याच काळात नुपूर तिच्या आयुष्यात आले. नुपूरकडून फिटनेसचे धडे घेत असताना इरा त्याच्या प्रेमात पडली. सोशल मीडियावर या दोघांनी त्यांचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात हे दोघेही एकत्र वर्कआउट करताना दिसत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकेच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली.

डिसेंबरमध्ये झाले होते इराचे ब्रेकअप

नुपूरच्या आधी इरा मिशाल कृपलानी नावाच्या संगीतकारासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांचे रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते, पण डिसेंबर 2019 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर, इरा नैराश्येत असल्याचा खुलासा करुन चर्चेत आली होती.

इरा नैराश्यात होती
इराने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करुन डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केला होता. “मी गेल्या चार वर्षांपासून नैराश्यात आहे. डॉक्टरांच्या मते मी क्लिनिकली ड्रिप्रेस आहे. पण आता मला बरे वाटतंय. नैराश्यात असलेल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचे आहे. पण काय करायचे ते अद्याप मी निश्चित केलेले नाही. तुम्ही आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करु नका. शरीरासोबतच मनाला देखील तंदुरुस्त करण्यासाठी काम करा.” अशा आशयाचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्ट करुन इराने मानसिक स्वास्थ्याचे महत्व समजावून सांगितले होते.

इराने केले आहे रंगभूमीवर काम

23 वर्षीय इराने गेल्या वर्षी 'युरीपाइड्स मीडिया' नावाच्या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. हे नाटक तिने दिग्दर्शित सुद्धा केले होते. या नाटकातून वरुण धवनची भाची अंजनी धवनने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser