आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावावर प्रतिक्रिया:आमिरच्या लेकीने सांगितले तिचे खरे नाव, म्हणाली- 'माझे नाव आयरा आहे, चुकीचे नाव उच्चारल्यास पाच हजार द्यावे लागतील'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयरा म्हणाली - जो कुणी माझे नाव यापुढे चुकीचे उच्चारेल त्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानची लेक सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिरच्या मुलीने आपल्या डिप्रेशन आणि रिलेशनशिपविषयी उघडपणे भाष्य केले. आता ती आपल्या नावामुळे चर्चेत आली आहे. आमिरच्या लेकीला आपण सर्वजण इरा या नावाने ओळखतो. मात्र एक व्हिडिओ पोस्ट करत आता तिने आपले खरे नाव काय आहे हे सांगितले आहे. सर्वजण आपल्या नावाचा चुकीचा उल्लेख करत असल्याचे तिने म्हटले आहे. आपले खरे नाव इरा नसू आयरा असल्याचे ती म्हणाली आहे.

चुकीचे नाव उच्चारल्यास द्यावे लागतील 5 हजार रुपये

व्हिडिओमध्ये आयरा म्हणतेय - अनेकजण माझे नाव इरा म्हणत असल्याने माझ्या मैत्रिणींनी मला प्रचंड त्रास दिला आहे. पण माझे नाव इरा नसून ते आयरा आहे,' असे ती म्हणाली आहे. सोबतच तिने तिचे नाव कसे उच्चारावे हे या व्हिडिओत सांगितले आहे. ती म्हणाली, 'माझं नाव इरा नाही तर eye-ra म्हणजेच आयरा आहे.'

पुढे आयरा म्हणाली, 'जो कुणी माझे नाव यापुढे चुकीचे उच्चारेल त्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन.'

असे आहे आयराचे खासगी आयुष्य
आमिरची मुलगी आयराने पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिले आहे. 2019 मध्ये तिने युरीपेड्स मेडिया या नाटकाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले. या नाटकात हेजल कीच आणि जुनैद खान (आयराचा मोठा भाऊ) मुख्य भूमिकेत होते. गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयराने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...