आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा:14 वर्षांची असताना ओळखीच्या लोकांकडून माझे लैंगिक शोषण झाले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये धक्कादायक खुलुसा केला आहे. इराने सांगितले की, 14 वर्षांची असताना ओळखीच्या लोकांकडून तिचे लैंगिक शोषण झाले होते. 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या दिवशी इराने डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केला होता, यानंतर अनेकजण तिला डिप्रेशनचे कारण विचारत होत. याबाबत बोलताना इराने या गोष्टीचा खुलासा केला.

इराने व्हिडिओत म्हटले की, जेव्हा मी 14 वर्षांची होते, तेव्हा माझे लैंगिक शोषण करण्यात आले होते. ती फार विचित्र परिस्थिती होती. मला काहीच कळत नव्हते की, काय होत आहे ? आणि जे लोक हे लैंगिक शोषण करत होते, ते माझ्या ओळखीचे होते. मला काहीच कळत नव्हते की, हे काय होत आहे आणि ते हे कृत्य का करत आहेत. मला जेव्हा समजले की, हे काय होत आहे, तेव्हा मी स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आणि त्याबद्दल विचार करणे बंद केले.