आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातं तुटलेलं:आमिर खानचा भाचा इम्रानपासून विभक्त झालेल्या अवंतिकाने सोशल मीडियावर लिहिले - 'एवढ्या वर्षांत मला कळले की आपण कधीच पळवाट काढू शकत नाही'

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी लिहिले होते - 'लग्न टिकवणे कठीण आहे'

अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी 3 जुलै रोजी अधिकृत निवेदन जारी करत विभक्त होत असल्याची घोषणा केली. आमिरच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर आता त्याचा भाचा इम्रान खान याचे वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इम्रानची पत्नी अवंतिका मलिकने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक कोट शेअर केला आहे, ज्याचा अर्थ त्यांच्या वैवाहिक जीवनाशी जोडला जातोय.

अवंतिकाने लेखक जुनोट डियाज यांचा एका कोट शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे: 'आणि या वर्षांनी मला काही शिकवले असेल तर ते हे की आपण कधीही पळवाट काढू शकत नाही. कधीच नाही.'

यापूर्वी लिहिले होते - 'लग्न टिकवणे कठीण आहे'

याआधीही अवंतिकाने आपल्या पोस्टमध्ये लग्न आणि घटस्फोटाचा संदर्भ देत जीवनाच्या इतर अनेक पैलूंवर आपले मत व्यक्त केले आहे. तिने लिहिले होते, 'लग्न टिकवणे कठीण आहे, घटस्फोट घेणे कठीण आहे, तुम्ही तुमचा कठीण मार्ग निवडता. लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणेही अवघड आहे. आपण आपला कठीण मार्ग निवडला.'

ती पुढे म्हणाली होती, 'कर्जात राहणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत राहणेही कठीण आहे. आपण आपला कठीण मार्ग निवडला. संवाद ठेवणे अवघड आहे. संवाद नसणेही कठीण आहे. आपण आपला कठीण मार्ग निवडला. आयुष्य कधीच सोपे नसते हे नेहमीच कठीण असते. पण आपल्याला आपला कठीण मार्ग निवडावा लागेल. तो हुशारीने निवडा', अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली होती.

2019 मध्ये सोडले इम्रानचे घर
गेल्या दोन वर्षांपासून इम्रान-अवंतिकाच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. 24 मे 2019 रोजी अवंतिका इम्रानचे घर सोडून निघून गेली. ती मुलगी इमारासोबत तिच्या पालकांच्या घरी राहत आहे. दोघांच्या कुटुंबियांनी इम्रान आणि अवंतिका यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.

इम्रान आणि अवंतिकाचे 2011 मध्ये लग्न झाले होते. जून 2014 मध्ये त्यांची मुलगी इमाराचा जन्म झाला होता. लग्नाआधी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.

इम्रानने 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यापूर्वी तो बाल कलाकार म्हणून आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात झळकला होता. इम्रानने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला असून तो दिग्दर्शनात आपला हात आजमावत आहे. सध्या तो एकता कपूरचा वेब शो मॉम (मार्स ऑर्बिट मिशन) चे दिग्दर्शन करीत आहे. या शोमध्ये भारताचे मिशन मंगल दाखवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...