आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शनपटाद्वारे कमबॅकची इच्छा:'धूम 4'द्वारे पुनरागमन करू इच्छितो आमिर खान, आदित्य चोप्राकडे केली सिक्वेलसाठी विनंती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लवकरच 'धूम 4' द्वारे दमदार कमबॅकची तयारी करत आहे. अलीकडेच आमिरने यशराज फिल्म्सकडे 'धूम' सिरीजचा पुढील सिक्वेल बनवून चित्रपटातील 'साहिर' आणि 'समर' या पात्रांना पडद्यावर परत आणण्याची विनंती केली आहे.

साहिर, समीर यांना पुन्हा पडद्यावर आणू इच्छितो आमिर
'पठाण'च्या यशानंतर यशराज स्पाय युनिव्हर्सचा 'टायगर 3' देखील लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होईल. त्यामुळे आमिरने आदित्य चोप्राकडे 'धूम'चा सिक्वेल बनवण्याची विनंती केली आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, आमिर खानला 'धूम'च्या सिक्वेलमध्ये त्याने पूर्वी साकारलेले पात्र परत साकारायची इच्छा आहे.

अ‍ॅक्शन हा आमिरचा स्ट्राँग पॉइंट
'धूम 3', 'गजनी', 'सरफरोश' आणि 'गुलाम' यांसारख्या चित्रपटांमधील आमिरच्या अ‍ॅक्शन सीन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. एक सारखाच कंटेंट प्रेक्षकांना देऊ इच्छित नसल्याने आमिरने अ‍ॅक्शनपटातून ब्रेक घेतला होता. पण आता आमिर पुन्हा एकदा थ्रिलिंग अ‍ॅक्शनची संधी मिळेल, अशा स्क्रिप्टच्या शोधात आहे.

'कॅम्पिओन्स' चित्रपटात काम करण्यास नकार
गेल्या वर्षी रिलीज झालेला आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने चित्रपटांपासून काही काळाचा ब्रेक घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर त्याच्या चित्रपटांच्या निवडीबाबत साशंक आहे. त्यामुळेच आमिरने शेवटच्या क्षणी 'कॅम्पिओन्स' या स्पॅनिश चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे- आमिर
एका पत्रकार परिषदेत आमिरने सांगितले होते की, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने चित्रपटांपासून काही काळ ब्रेक घेतला आहे. 'शुभ मंगल सावधान'चे दिग्दर्शक आरएस प्रसन्ना या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पण आमिरने 'कॅम्पिओन्स' या चित्रपटात अभिनय करण्याऐवजी आता त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.