आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:'अतरंगी रे'चे शूटिंग संपल्यानंतर आनंद एल राय यांचा कोविडचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, लंडनमध्ये गौतम गुलाटीला कोरोनाची लागण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आनंद मुंबईत आहे, तर गौतम सध्या लंडनमध्ये आहे.

अनलॉक झाल्यानंतर इंडस्ट्रीत चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि याचदरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले. गुरुवारी दिग्दर्शक आनंद एल राय आणि अभिनेता गौतम गुलाटी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली. आनंद मुंबईत आहे, तर गौतम सध्या लंडनमध्ये आहे.

गौतम 15 दिवसांपासून लंडनमध्ये आहे
गौतम मागील 15 दिवसांपासून लंडनमध्ये आहे. तेथून त्याने एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्याचा हात दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. गौतमच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे तो अलीकडेच दिव्या खोसला कुमारसह बेशरम बेवफा म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता. गौतमला त्याच्या चाहत्यांना सरप्राईज द्यायचे होते, पण त्याआधीच त्याला कोरोना इन्फेक्शन झाले.

आनंद यांनी 'अतरंगी रे'चे शूटिंग पूर्ण केले
आनंद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, “माझे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. मात्र, माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. सध्या मी क्वारंटाइन आहे. तसंच सगळ्या नियमांचे नीट पालन करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी कृपया क्वारंटाइन रहा आणि नियमांचे पालन करा”, अशी पोस्ट आनंद राय यांनी केली आहे.

बर्‍याच सेलेब्रिटींना झाली होती कोरोनाची लागण
अमिताभ बच्चन, कनिका कपूर, मोरानी कुटुंब, नीतू कपूर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, वरुण धवन, कृती सेनन, रकुलप्रीत सिंग, तमन्ना भाटिया, तनाज करीम यांच्यासह अनेक सेलेब्स कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि त्यातून सुदैवाने त्यांची सुटकादेखील झाली.

बातम्या आणखी आहेत...