आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री महिमा चौधरी अलीकडेच विद्युत जामवालच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'IB71' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी तिची लेक आर्यानादेखील तिच्यासह दिसली. दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओ समोर येताच महिमाच्या मुलीची हेअरस्टाइल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लोक आर्यानाची तुलना ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्याशी करत आहेत.
आईसोबत दिली पोज
महिमाची एकुलती एक आर्याना आता 16 वर्षांची आहे. ती हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते. ती आपल्या आईसारखीच स्टायलिशदेखील आहे. इव्हेंटमध्ये आर्याना ऑल व्हाइट कॅज्युअल लूकमध्ये दिसली. यावेळी दोघांनीही एकत्र फोटो क्लिक केले.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्सनी आर्यानाची तुलना आराध्याशी करायला सुरुवात केली. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आराध्याची हेअरस्टाइल कॉपी केली आहे, पण ती आराध्यापेक्षा छान दिसतेय.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'आराध्यापेक्षा सुंदर'. तर आणखी एकाने लिहिले की, 'आर्याना तिच्या आईसारखीच सुंदर दिसते'.
सिंगल मदर आहे महिमा चौधरी
महिमा चौधरीने 19 मार्च 2006 रोजी प्रसिद्ध आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होता. आर्याना हिचा जन्म 10 जून 2007 रोजी झाला. पण 2013 मध्ये महिमा आणि बॉबी यांचा घटस्फोट झाला. मुलीची कस्टडी महिमाला मिळाली आहे. वृत्तानुसार, महिमा लवकरच तिच्या मुलीला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.