आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पोन्नियन सेल्वन 1'ची सक्सेस पार्टी:ऐश्वर्या-अभिषेकसोबत दिसली आराध्या, त्रिशा कृष्णनने शेअर केला व्हिडिओ

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिरत्नम यांच्या 'पोन्नियन सेल्वन 1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला देशाबरोबरच परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी नुकतीच एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्याचा एक व्हिडिओ त्रिशा कृष्णनने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्यासोबत अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्याही दिसली. व्हिडिओमध्ये त्रिशा अभिषेकसोबत पोज देताना दिसत आहे. यावेळी चित्रपटाच्या स्टार कास्टने सक्सेस पार्टीचा आनंद लुटला. त्रिशाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'कॅप्शनसाठी येथील vibe पुरेसे आहेत'. 'पोन्नियन सेल्वन'ने जगभरात 460 कोटींहून अधिक कमाई केली आणि 2022 चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...