आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनला मिळाला अनुराग बासूंचा 'आशिकी 3':म्हणाला - या चित्रपटात काम करणे ही माझ्यासाठी स्वप्नपुर्ती आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'भूल भुलैया 2'च्या यशानंतर कार्तिक आर्यनला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. आता कार्तिकने 'आशिकी 3'साठी अनुराग बासूसोबत हातमिळवणी केल्याची बातमी आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी अनेक बड्या बॉलिवूड स्टार्सची नावे समोर येत होती, पण आता अखेर कार्तिकला हा चित्रपट मिळाला आहे.

कार्तिकने सोशल मीडियावर दिली माहिती
कार्तिकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. कार्तिकने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'बासू दांसोबत माझा पहिला चित्रपट आशिकी 3'. मात्र, आतापर्यंत निर्मात्यांनी या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. ही एक प्रेमकथा असेल, जी आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळी असेल.

कार्तिक आर्यनने ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
कार्तिक आर्यनने ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

कार्तिकचे स्वप्न पूर्ण झाले
व्हरायटीशी बोलताना कार्तिक म्हणाला, “टाइमलेस क्लासिक आशिकी हा एक चित्रपट आहे जो मी पाहत मोठा झालो आहे आणि आशिकी 3 मध्ये काम करणे हे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. या संधीसाठी मी भूषण कुमार आणि महेश भट्ट यांचे आभार मानतो. मी अनुराग यांच्या कामाचा खूप मोठा चाहता आहे आणि आता त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळेल."

1990 मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचा पहिला भाग
राहुल रॉय आणि अनु अग्रवाल स्टारर 'आशिकी' 1990 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आणि आजही त्याची गाणी प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात. 2013 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल 'आशिकी 2' मोहित सुरीने दिग्दर्शित केला होता. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर चित्रपटही लोकांना आवडला आणि तो हिट ठरला.

'आशिकी 3'चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.
'आशिकी 3'चे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत.

प्रीतमच्या संगीताची चालणार जादू
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्ट फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार अशी चर्चा होती, परंतु चित्रपट कधीच फ्लोअरवर आला नाही. 'आशिकी 3'च्या निर्मात्यांनी प्रीतमला चित्रपटाच्या आयकॉनिक संगीतासाठी फायनल केले आहे. कार्तिकने नुकतेच कियारा अडवाणीसोबत 'सत्यप्रेम की कथा'चे शूटिंग सुरू केले आहे. याशिवाय कार्तिककडे 'शेहजादा', 'फ्रेडी' आणि 'कॅप्टन इंडिया' हे चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...