आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल रॉय हेल्थ अपडेट:राहुलला नानावटी हॉस्पिटलमधून आता दुस-या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मेहुणा म्हणाला - त्याला बरं होण्यासाठी बराच काळ लागेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारगिलमध्ये शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका

'आशिकी' फेम राहुल रॉयला नानावटी हॉस्पिटमधून सोमवारी डिस्चार्ज मिळाल्याचे वृत्त होते. मात्र त्याचा मेहुणा रोमिर सेनने सांगितल्यानुसार, राहुलला नानावटीमधून आता वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. एका इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना रोमिरने हा खुलासा केला.

बरे होण्यासाठी बराच काळ लागेल
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत रोमिरने सांगितले की, राहुलची फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सेशल चालू आहेत. त्याला पुर्णपणे बरे होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. राहुलला कारगिलमध्ये आलेल्या ब्रेन स्ट्रोकविषयी रोमिर म्हणाला, हे राहुलने आपल्या प्रकृतीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे घडले आहे. त्याने सांगितल्यानुसार, राहुलचे बहीण भाऊ लवकरच याविषयी सांगतील. राहुल आता हळूहळू बरा होतोय.

अलीकडे शेअर केला होता व्हिडिओ
या आठवड्याच्या सुरुवातीस राहुल रॉयने सोशल मीडियावर आपल्या प्रकृतीविषयी अपडेट देताना एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो आपल्या बहिणीच्या मदतीने उभा झालेला दिसला. व्हिडिओसह राहुलने लिहिले, मी बरा होतोय. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल माझ्या सर्व मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. लवकरच मी परतेल.

कारगिलमध्ये शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका
52 वर्षीय राहुल रॉयला कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले होते. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

'आशिकी'द्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser