आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल जगलीये साध्वीचे आयुष्य:उणे तापमानात जवळ होते केवळ 2 जोडी कपडे, टक्कलही केले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आली होती. पण अचानक ती प्रसिद्धीआड गेली. आता अलीकडेच एका मुलाखतीत अनुने तिच्या आध्यात्मिक जीवनाविषयी खुलासा केला आहे. एकेकाळी अनु अग्रवाल ही साध्वीचे आयुष्य जगली आहे. त्यावेळी उणे तापमानात तिच्याजवळ केवळ दोन जोडी कपले आणि एक स्वेटर होते. तिचे तेथील आयुष्य सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

मी मध्यरात्री 2:30 वाजता उठायचे - अनु
अनुने नुकतीच युट्यूबर सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत आपल्या जुन्या आयुष्याबद्दल बोलताना अनु म्हणाली- 'जेव्हा मी एका साध्वीचे जीवन जगत होते, तेव्हा मी तिथे उणे 5 डिग्री तापमानात राहायचे. तिथे माझ्याकडे गीझर नव्हता, माझ्याकडे फक्त माझी बॅग, २ जोडी कपडे आणि एक स्वेटर होते. तेवढ्याच कपड्यात मी बरीच वर्षे काढली. आमचा अध्यात्माचा वर्कशॉपचा पहिला वर्ग पहाटे साडेचार वाजता सुरू व्हायचा, त्याआधी मी माझी सगळी कामे आटपत असायचे. या सर्व गोष्टींसाठी मला पहाटे अडीच वाजता उठावे लागायचे.'

अनुने सांगितले ते दिवस निवांत होते
अनु पुढे म्हणाली- 'तिथे आम्हाला थंड पाण्याने आंघोळ करावी लागायची. त्यामुळे कित्येक महिने माझे हातपाय चांगलेच गोठले होते. त्यावेळी मी टक्कल केल होते. कालांतराने या सगळ्या गोष्टी खूप सुसह्य वाटू लागल्या होत्या. असे असूनही ते दिवस अतिशय शांत आणि संस्मरणीय होते. मी त्यावेळी लक्झरी लाइफपासून खूप दूर होते.'

जेव्हा हजारो लोक धावले होते अनुच्या कारमागे
1999 मध्ये अनूचा अपघात झाला आणि ती कोमामध्ये गेली. अपघातापूर्वी ती एका आश्रमात राहायची. 2001 साली तिने संन्यास घेतला आणि पूर्ण टक्कल करण्याचा निर्णय घेतला होता. या मुलाखतीत अनुने चाहत्यांचा किस्सादेखील शेअर केला. हा किस्सा सांगताना अनु म्हणाली, "त्या दिवशी मी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जात होती, तिथे खूप गर्दी होती. मला पाहताच गर्दी अचानक थांबली, ग्रीन सिग्नल झाल्यावरही लोक जागचे हलले नाहीत. अचानक लोकांचा जमाव माझ्या दिशेने धावला. त्यादिवशी मी गाडीत एकटीच होती आणि ड्रायव्हरही सुट्टीवर होता. अचानक लोक माझ्या कारच्या खिडक्या ठोठावू लागले. हे पाहून मी घाबरले. मला वाटले की, जमावाने माझ्या गाडीचे नुकसान केले." अनुने सांगितल्यानुसार, एवढी गर्दी बघून ती खूप घाबरली होती आणि गाडीतून बाहेर पडण्याची तिची हिंमतदेखील झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...