आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयला दिली जातेय स्पीच थेरपी, रुग्णालयातील फोटो केला शेअर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहिणीने स्ट्रिक्ट डाएटवर ठेवले आहे - राहुल

ब्रेन स्ट्रोकनंतर रूग्णालयात दाखल झालेल्या 52 वर्षीय अभिनेता राहुल रॉयला आता स्पीच थेरपी दिली जात आहे. त्याला मुंबईतील मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून 8 डिसेंबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. राहुलने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रुग्णालयात दाखल होऊन 19 दिवस झाल्याचे नमूद केले आहे.

राहुलचा मेहुणा रोमिर सेनने सांगितले की, आता खासगी रुग्णालयात राहुलवर उपचार सुरू आहेत. त्यांना पूर्णपणे बरे व्हायला आणखी काही आठवडे लागतील.

बहिणीने स्ट्रिक्ट डाएटवर ठेवले आहे - राहुल
मंगळवारी राहुल रॉयने सोशल मीडियावर स्वत:चे एक छायाचित्र शेअर केले असून त्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये नाश्ता करताना दिसत आहेत. याशिवाय त्याने आपली बहीण प्रियांकासोबतचाही एक फोटो शेअर केला आहे. राहुलने फोटोसह लिहिले - हॉस्पिटलमध्ये 19 वा दिवस आणि ब्रेकफास्टचा आनंद घेतोय. मी बरा होतोय. माझ्या आहारावर डॉक्टर आणि माझ्या बहिणीचे पूर्ण नियंत्रण आहे.

बातम्या आणखी आहेत...