आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

52 वर्षांची झाली अनू अग्रवाल:एका अपघातानंतर कोमात गेल्याने 'आशिकी गर्ल'ची गेली होती स्मरणशक्ती, आता झोपडपट्टीत राहणा-या गरीब मुलांना शिकवते योगा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनूने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत.

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चेहेर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईला येत असतात. यापैकी काही जणांच्या हाती यश येतं तर काहींना निराश होऊन येथून निघून जाव लागतं. बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत, जे सुरुवातीच्या काळात येथे खूप यश आणि प्रसिद्धी मिळवतात. मात्र कालांतराने त्यांची जादू कमी होते आणि ते अज्ञातवासात निघून जातात. यामध्ये अधिक नावे ही अभिनेत्रींची आहेत, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात वाहवाह मिळवली आणि नंतर अचानक फिल्मी दुनियेतून निघून गेल्या. असेच एक नाव म्हणजे अनू अग्रवाल.

11 जानेवारी 1969 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या अनूने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 90 च्या दशकात 'आशिकी' या सिनेमाद्वारे स्टारडम मिळवणारी अनू अचानकच बॉलिवूडमधून गायब झाली. आता ग्लॅमर वर्ल्डपासून दूर राहून ती झोपडपट्टीत राहणा-या गरीब मुलांना मोफत योगा शिकवते.

वयाच्या 21 व्या वर्षी मिळाला होता ब्रेक
11 जानेवारी 1969 मध्ये दिल्लीत अनू अग्रवालचा जन्म झाला होता. दिल्ली यूनिव्हर्सिटीतून तिने समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. 1990 साली महेश भट यांनी 'आशिकी' सिनेमात अनूला पहिला ब्रेक दिला होता. या सिनेमामुळे अनू एका रात्रीत स्टार झाली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. वयाच्या केवळ 21 व्या वर्षी अनू आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि भोळ्याभाबड्या चेह-यामुळे उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. मात्र अल्पावधीतच तिच्या स्टारडमचा ग्राफ खाली येऊ लागला.

'आशिकी'नंतर अनूचे 'गजब तमाशा', 'खलनायिका', 'किंग अंकल', 'कन्यादान' आणि 'रिटर्न टू ज्वेल थील' हे सिनेमे कधी आले आणि कधी गेले, हे कुणाला कळलेसुद्धा नाही.

हिंदीत स्टारडम नाहिसे झाल्यानंतर वळली साऊथकडे
हिंदी सिनेमात मिळालेल्या अपयशानंतर अनू तामिळ सिनेमांकडे वळली. 'थिरुदा-थिरुदा' या तामिळ सिनेमात ती झळकली होती. मणिकौल यांच्या 'द क्लाऊड डोर' या शॉर्ट फिल्ममध्ये अनूने चक्क न्यूड सीन देऊन प्रसिद्धी मिळवली होती. मात्र 1996 सालानंतर तिने अभिनयाला रामराम ठोकला. 1997 सालापासून ती योगा ट्रेनर झाली. मात्र काही प्रेमसंबंध आणि व्यसनांमुळे ती काळी काळ चर्चेत राहिली. पण अल्पावधीतच सिनेमे आणि गॉसिप्सपासून ती दूर झाली.

1999 मध्ये झाला मोठा अपघात, 29 दिवस होती कोमात
1999 साली झालेल्या एका अपघाताने तिचे आयुष्यच बदलून गेले. या अपघाताने तिची स्मरणशक्ती कमी झाली. चालणे-फिरणे बंद झाले होते. 29 दिवस कोमात राहून शुद्धीवर आल्यानंतर ती स्वतःला आणि आपल्या भाषेलासुद्धा विसरली होती. शरीराचा खालचा भाग पॅरलाईज्ड झाला होता.

दीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर ती या संकटातून वर आली. मित्र आणि कुटुंबियांच्या मदतीने तिने पुन्हा इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकली. तीन वर्षांच्या उपचारानंतर तिची स्मरणशक्ती परत आली होती. प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर आता अनूला लाईमलाईटमध्ये परतायचे नाहीये. शिवाय आपल्या भूतकाळाबद्दलही तिला कुणाशीही बोलायचे नाहीये. आता ती योगा ट्रेनर आहे. 'अनयूजवल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' हे अनूचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...