आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आशिकी'च्या अभिनेत्याचा वाढदिवस:ब्लॅकमध्ये विकल्या गेली होती 'आशिकी'ची तिकिटं, राहुल रॉयने 11 दिवसांत साइन केले होते 47 चित्रपट, नंतर परत करावे लागले होते पैसे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्लॅकमध्ये विकल्या गेली होती चित्रपटाची तिकिटं

बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 फेब्रुवारी 1968 रोजी कोलकाता येथे त्याचा जन्म झाला. 1990 मध्ये आलेल्या आशिकी या चित्रपटातून तो रातोरात स्टार झाला खरा, मात्र त्यानंतर त्याचे करिअर रुळावरुन घसरले. 2007 मध्ये बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तो थोडा लाइमलाइटमध्ये आला, मात्र पुन्हा तो गायब झाला होता.

ब्लॅकमध्ये विकल्या गेली होती चित्रपटाची तिकिटं
काही वर्षांपूर्वी आशिकी या चित्रपटातील कलाकार राहुल रॉय, अनु अग्रवाल, दीपक तिजोरी 'द कपिल शर्मा शो'मध्ये आले होते. या वेळी टीमने जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. राहुल रॉयने सांगितले होते की, माझी या चित्रपटात निवड करण्यासाठी महेश भट्‌ट यांनी हट्ट धरला होता. मी भट्ट साहेबांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा त्यांना माझी हेअर स्टाइल आणि ड्रेसिंग खूप आवडली होती. ते मला या चित्रपटासाठी साइन करत होते तेव्हा इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक मला प्रमुख भूमिका दिल्यामुळे मला यात घेऊ नका आणि हा प्रयोग अपयशी ठरेल असे महेश यांना सांगत होता. यापैकी बहुतांश लोक म्हणाले होते की, मी नायकासारखाही दिसत नाही. मला आठवते, माझे केस विखुरलेले होते. यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे झाकले जात होते. तरीदेखील भट्ट साहेब मला चित्रपटात घेण्यावर ठाम होते.'

राहुलने पुढे सांगितले होते की, हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी भट्ट साहेबांसोबत अनेक चित्रपटांच्या सेट्सवर जात होते, जेणेकरून अभिनेत्यांकडे पाहून दिग्दर्शन आणि अभिनयातील बारकावे शिकता येतील. मी अनुपम खेर, मीनाक्षी शेषाद्री आदी दिग्गज कलावंतांचे काम त्या वेळी पाहत होतो. भट्ट साहेबांनी नेहमीच आपल्या मनाचे ऐकले आणि 'आशिकी'साठी मला प्रमुख भूमिका बहाल केली. त्यानंतर जे झाले तो इतिहास बनला. हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा लोक तो पाहण्यासाठी खूप उत्सुक होते, हे मला त्या वेळी कळले. लोक ब्लॅकमध्ये 1500 रुपयांची तिकिटे खरेदी करत होते.'

21 निर्मात्यांचे पैसे करावे लागले होते पर
आणखी एका मुलाखतीत राहुलने आशिकीविषयी सांगितले होते, 'आशिकी हा चित्रपट सहा महिने हाऊसफूल होता. मात्र त्याचा फायदा मला होताना दिसत नव्हता. म्हणून मी काळजीने महेश भट्ट यांच्याकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले होते की, लोक तुला आता बघत आहेत. तुला पडद्यावर कसे सादर करावे, याचा ते विचार करत आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी माझ्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. मी फक्त 11 दिवसांत 47 चित्रपट साइन केले होते. एकादिवशी मी तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग करायचो. नंतर माझ्या लक्षात आले की, मी खूप चित्रपट साइन केले आणि एकाचवेळी या सर्वांचे चित्रीकरण करणे मला शक्य होणार नाही. म्हणून मी 21 निर्मात्यांना त्यांचे पैसे परत केले होते.'

बिग बॉस सीझन वनचा विजेता ठरला होता राहुल
राहुल 2007 मध्ये बिग बॉस सीझन 1 चा विजेता ठरला होता. त्याने 'हर स्टोरी' या सी-ग्रेड चित्रपटातही काम केले होते. राहुलने यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये सपने साजन के, पहला नशा, गुमराह, भूकंप, हंसते-खेलते, नसीब, अचानक फिर कभी, नॉटी बॉय आणि क्राइम पार्टनर सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 2015 मध्ये '2 बी ऑर नॉट टू बी' हा चित्रपटही त्याने केला होता. या अगोदर तो 2010 मध्ये आलेल्या ‘अदा अ वे ऑफ लाइफ’ या लघुपटात दिसला होता.

शूटिंग दरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोक
गेल्या वर्षी राहुल कारगिलच्या मायनस 12 डिग्री तापमानात गलवान व्हॅलीवर आधारित 'एलएसी-लाइव्ह द बॅटल' चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यावेळी त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यानंतर बरेच दिवस मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. सध्या राहुल चित्रपटांपासून ब्रेक घेऊन घरी विश्रांती घेतोय. त्याच्यावर सध्या स्पीच थेरपी सुरु आहे. त्या ब्रेन स्ट्रोकमधून पूर्ण सावरायला आणखी काही अवधी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...