आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आश्रम’ वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात:अभिनेता बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना कोर्टाची नोटीस, 11 जानेवारीला कोर्टात राहावे लागणार हजर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना 11 जानेवारीला कोर्टात जायला हजर राहवे लागणार आहे.

प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजचा दुसरा सीझन अलीकडेच प्रदर्शित झाला आणि यालादेखील पहिल्या सीझनप्रमाणेच प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. त्यानंतर आता याच्या तिस-या सीझनची देखील तयारी सुरु झाली आहे. पण या वेब सीरिजवरील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. करणी सेनेने या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता जोधपूर सत्र न्यायालयाने आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार आता या दोघांना 11 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

वकील खुश खंडेलवाल यांच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला आहे. पण बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आता बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना 11 जानेवारीला कोर्टात जायला हजर राहावे लागणार आहे.

‘आश्रम चॅप्टर-2’ या वेब सीरिजमध्ये आश्रमाची काळी बाजू दाखवली गेली आहे. अभिनेता बॉबी देओल याने या वेब सीरिजमध्ये ‘काशीपूरचा बाबा निराला’ हे पात्र साकारले आहे. ‘आश्रम’ची कथा ड्रग्ज, बलात्कार, नरसंहार आणि राजकारणाभोवती फिरत आहे. मालिकेत सनातन धर्माच्या बाबांना ढोंगी, भोगी, गुन्हेगार दाखवून सनातन धर्माची बदनामी केली जात आहे. केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी या वेब सीरिजला ‘आश्रम’ असे नाव देण्यात आले आहे, असा आरोप प्रकाश झांवर करण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser