आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक आनंदाची बातमी:'एबीसीडी' फेम अभिनेता पुनीत पाठकचा गर्लफ्रेंड निधी मुनी सिंहसोबत साखरपुडा, सेलेब्रिटींकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुनीतने आपली गर्लफ्रेंड निधी मुनी सिंहसोबत अलीकडेच साखरपुडा केला आहे.

लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून आतापर्यंत वाईट बातम्यांमुळे लोक निराश झाले, तर दुसरीकडे अनुष्का-विराट, नताशा-हार्दिक, करीना-सैफ सारख्या अनेक सेलेब्सनीही चाहत्यांना चांगली बातमी सुद्धा दिली आहे. दरम्यान, डान्स प्लसचा जज, कोरिओग्राफर आणि अभिनेता पुनीत पाठकनेही आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पुनीतने आपली गर्लफ्रेंड निधी मुनी सिंहसोबत अलीकडेच साखरपुडा केला आहे. दोघांच्या साखरपुड्याची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत. त्यानंतर वरुण धवन, रेमो डिसूझा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

एबीसीडी फेम अभिनेता पुनीत पाठकने इंस्टाग्रामद्वारे आपल्या साखरपुड्याच्या सोहळ्याची झलक शेअर केली आहे.या फोटोत पुनीत आणि निधी अतिशय आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.

  • इंडस्ट्रीतील मित्रांनी अभिनंदन केले

पुनीतने अचानक साखरपुडा करुन सगळ्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. साखरपुड्याची छायाचित्रे समोर येताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. रेमो डिसूझा, टेरेंस लुईस, लॉरेन गोटलिब, धर्मेश, निती मोहन, अभिनेत्री सुगंधा मिश्रा, गौहर खान आणि ईशा गुप्तासह अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा सह-कलाकार राहिलेल्या वरुण धवननेही त्याचे अभिनंदन केले आहे.