आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:ABCD फेम अभिनेता किशोर शेट्टीला ड्रग्ज सप्लाय केल्याप्रकरणी अटक, मंगळुरु येथून घेतले पोलिसांनी ताब्यात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • किशोरचा रिया चक्रवर्ती प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून तपास सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 15 हून अधिक जण अटकेत आहेत. चौकशीदरम्यान रियाने एनसीबीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे सांगितली आहेत. त्यानंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.आता बातमी आहे की, मंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने (CCB) शनिवारी ड्रग्ज प्रकरणात कोरिओग्राफर आणि अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. त्याच्यावर ड्रग्ज बाळगण्याचा आरोप आहे. किशोरचा रिया चक्रवर्ती प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.

किशोर शेट्टीने प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांच्या ABCD या चित्रपटात काम केले आहे. त्याने रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स मध्ये देखील सहभाग घेतला होता. ज्यामुळे तो चर्चेत आला होता.

मंगळुरू पोलीस विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, तो मुंबईहून मंगळुरूमध्ये ड्रग्जची डिलीव्हरी करत होता. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबत बातमी दिली आहे. या अहवालानुसार किशोर शेट्टीविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान सुशांत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीच्या गळाला आणखी एक मासा लागला आहे. एनसीबीने मुंबईहून ड्रग्ज पॅडलर राहिल विश्राम नावाच्या व्यक्तीला एक किलो चरससह ताब्यात घेतले आहे. झोनल डायरेक्टरनी याबाबत माहिती दिली आहे. त्याने हिमाचल प्रदेशातून चरस मागवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.