आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाची बातमी:'एबीसीडी' फेम अभिनेता पुनीत पाठकच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, गर्लफ्रेंड निधी मुनी सिंह 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुनीत आणि निधी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

सध्या बॉलिवूडमध्ये सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर, गायक-अभिनेता आदित्य नारायण, टीव्ही अभिनेता शाहीर शेख हे लग्नबंधनात अडकले आहेत. यानंतर आता कोरिओग्राफर आणि 'एबीसीडी' फेम अभिनेता पुनीत पाठक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. स्वत: पुनीतने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. निधी मुनी सिंह हे पुनीतच्या होणा-या पत्नीचे नाव आहे. पुनीत आणि निधी बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

पुनीतने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 11 डिसेंबर 2020 ही तारीख दिसत आहे. “तारीख ज्यामुळे आपण कायम एकत्र राहू. तारीख जी आपले आयूष्य बदलेल. 11-12-2020 एक नवी सुरूवात” अशा आशयाचे कॅप्शन पुनीतने दिले आहे.

याचवर्षी झाला होता साखरपुडा पुनीतने 26 ऑगस्ट रोजी साखरपूडा केला. तर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपूडा सोहळा पार पाडला होता. पुनीतनेने इंस्टाग्रामद्वारे आपल्या साखरपुड्याच्या सोहळ्याची झलक शेअर केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser