आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा बदल:‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ शब्द वगळला, कलाकारांनी व्यक्त केला आनंद,  अभय देओल म्हणाला - ही एक सुंदर सुरुवात आहे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभय देओल, नंदिता दास, सोनाली कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

'फेअर अँड लव्हली' या फेअरनेस क्रीममधून आता 'फेअर' शब्द वगळण्यात आला आहे. या क्रिमची निर्मिती करणा-या हिंदुस्तान युनिलिव्हरने हा महत्त्वपूर्ण निणर्य घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कलाकारांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अभय देओल, नंदिता दास, सोनाली कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभयने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये योग्य निर्णयाकडे छोटे पाऊल असे या निर्णयाचे वर्णन केले आहे आहे. तर नंदिता दास म्हणाली की, हा फक्त प्रतीकात्मक बदल आहे, मोठा बदल अजून बाकी आहे.

  • ही एक सुंदर सुरुवात आहे - अभय

अभयने लिहिले, ''ब्लॅक लाव्हस मॅटर चळवळीने जगाला या बाजूने विचार करण्यास प्रवृत्त केले होते. पण काहीही चुकीचे झाले नाही. अशा फेअरनेस क्रीमच्या विक्री आणि जाहिरातींच्या विरोधात आवाज उठविणारा प्रत्येक जण या विजयासाठी पात्र आहे. आपल्याकडे सौंदर्य परिभाषित करणारे नियम मोडण्यासाठी अजून खूप लांबचा पल्ला गाठणे बाकी आहे. ही फक्त एक सुरुवात आहे, आपल्याला अजून बरेच पुढे जावे लागेल. पण ही प्रत्यक्षात एक सुंदर सुरुवात आहे', असे मत अभयने व्यक्त केले आहे. 

  • नंदिताला आशा आहे की, मोठ्या प्रमाणात बदल घडेल

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत नंदिता म्हणाली, "कोरोना महामारीच्या काळात अनेक सामाजिक चुकांना आश्चर्यकारक सहानुभूती मिळाली आहे. आज अशी घोषणा करण्यात आली की उत्पादनांमधून फेअरनेस, व्हाइटनिंग आणि लाइटनिंग हे शब्द काढून टाकले जातील, हे असे आहे जे आतापर्यंत कोणीही पाहिले नाही. ते फक्त प्रतीकात्मक आहे, त्यांनी बनविणे थांबवले नाही. फक्त संदेश बदलला. अद्याप मोठी पावले उचलली गेली नाहीत. अनेक ब्रांड यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतात.'

  • सोनाली कुलकर्णी म्हणाली, आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारु

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग आहे. आपणा सर्वांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. पण आता याला आळा बसेल आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू, असे सोनाली म्हणाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...