आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच सुरू होणार:संतोषसिंह दिग्दर्शित करतील अभिमन्यू दसानीचा ‘नौसिखिए’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिमन्यू दासानी, अमोल पाराशर आणि श्रेया धन्वंतरी लवकरच ‘नौसिखिए’ चित्रपटात दिसणार आहेत. आता या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर येत आहे. सूत्रानुसार, संतोष सिंह चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. त्याची कथा दोन लोकांवर आधारित आहे ते नवरीचे अपहरण करतात. चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. अभिमन्यूने या चित्रपटाविषयी सांगितले...’नौसिखिये’ हा छोट्या शहरांचा, त्याचा मूड दाखवणारा चित्रपट आहे. उत्कृष्ट संगीताबरोबरत त्यात विनोदही आहे. अमोल म्हणाला...’जेव्हा मी स्क्रिप्ट एेकली, त्याच वेळी होकार दिला होता. खरंच खूप मजा आली. लवकरच शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटाची निर्मिती लायन्सगेट इंडिया स्टुडिओच्या सहकार्याने एलिपसिस एंटरटेनमेंट करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...