आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर लावले गंभीर आरोप, म्हणाला - त्यांनी माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न केला होता

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2010 मध्ये आलेल्या 'दंबग' या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र दिग्दर्शक अभिनव कश्यप याने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले आहे.

अभिनवने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच बॉलिवूडमधील कटू अनुवभ लिहिताना त्याने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनीवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी माझे करिअर संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, असाही धक्कादायक आरोप अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर केला आहे.

  • बॉलिवूडमधील घराणेशाहीने माझे शोषण केले

अभिनवने सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे.  “बॉलिवूडमधील घराणेशाहीने  माझे शोषण केले. ‘दबंग’सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतरही माझी आज ही अवस्था आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून ‘दबंग 2’ काढून घेण्यात आला. याविरोधात मी आवाज उठवला. म्हणून त्यांनी इतर प्रोजेक्टही माझ्याकडून काढून घेतले. शिवाय मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली,' असा आरोप अभिनवने लावला आहे. 

  • अरबाज-सोहेलने माझी कामं बंद पाडली

अभिनवने आरोप करताना म्हटले की, अरबाज खाने श्री अष्टविनायक फिल्म्सचे प्रमुख राज मेहता यांना फोन करुन माझे इतर प्रोजेक्टस बंद पाडले. सायनिंग अमाऊंट घेऊन मी व्हायकॉम पिक्चर्ससोबत जुळलो होतो. पण तिथेही माझी हीच अवस्था झाली. यावेळी सोहेल खानने व्हायकॉमचे सीईओ विक्रम मल्होत्रांसोबत बोलून मला कामातून बाहेर काढले. मी सायनिंग अमाऊंट म्हणून घेतलेले 7  कोटी रुपये 90 लाख रुपये व्याजासह मला परत करावे लागले होते, असा धक्कादायक आरोप त्याने केला आहे. 

  • मला सतत धमक्या मिळत होत्या

अभिनव  पुढे म्हणाला, माझे प्रोजेक्ट बंद केले गेले आणि मला सतत जीवे मारण्याची धमकी मिळत गेली. माझ्या कुटुंबातील महिलांवर बलात्काराची धमकी मला मिळाली होती. यामुळे माझे मानसिक आरोग्य बिघडले होते आणि यातच माझा घटस्फोट झाला. मी 2017 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, तर माझी तक्रार नोंदवली गेली नाही. माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत, असे अभिनवने सांगितले. 

  • मला माझे शत्रू कळले आहेत

गेल्या 10 वर्षांत माझे शत्रू कोण आहेत, हे मला कळले आहे. सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान ही त्यांची नावे आहेत. येथे आणखी लहान मासेदेखील आहेत. पण सलमान खानचे कुटुंबीय विषारी साप आहेत. कुणालाही घाबरवण्यासाठी ते पैसा, राजकारणी आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या मिश्रणाचा मोठ्या हुशारीने वापर करत असतात, असे धक्कादायक विधान अभिनवने केले आहे. सोबतच त्याने त्याचा हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करुन फॉरवर्ड करण्याचे आवाहन केले आहे. 

  • अभिनव कश्यपचा संपूर्ण ब्लॉग वाचा येथे...
बातम्या आणखी आहेत...