आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण:'कजरारे कजरारे'च्या शूटिंगदरम्यान फुलला प्रेमांकुर, 'गुरु'च्या प्रीमिअरला अभिषेकने घातली ऐश्वर्याला लग्नाची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेकने हॉटेलच्या बालकनीत केले होते ऐश्वर्याला प्रपोज

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या यांच्या लग्नाला आज 14 वर्षे झाली आहेत. 20 एप्रिल 2007 रोजी मुंबईत दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. फिल्मी स्टार्स कायमच आपली रिअल लाइफ लव्ह स्टोरी आणि खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळत असतात. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लव्ह स्टोरी सुरुवातीपासूनच लाइमलाइटमध्ये राहिली.

लग्नापूर्वी ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्यासोबत नाव जुळले होते. तर अभिषेकचेही राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत सुत जुळल्याची चर्चा होती. अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडादेखील झाला होता, मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तिथेच तुटले होते.

अभिषेकने हॉटेलच्या बालकनीत केले होते ऐश्वर्याला प्रपोज
एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, टोरंटोमध्ये जानेवारी 2007 मध्ये झालेल्या 'गुरु' च्या प्रीमिअरनंतर, हॉटेलच्या बालकनीमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केले होते. अभिषेक म्हणाला होता, "मी ऐश्वर्याला प्रपोज करताना खुप नर्व्हस होतो. परंतू हिंमत करुन मी तिला मनातील गोष्ट सांगितली होती, ऐशने हो म्हणण्यासाठी एक सेकंदही लावला नाही." प्रीमिअरहून परतल्यानंतर दोघांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी 14 जानेवारी 2007 रोजी साखरपुडा केला होता. 20 एप्रिल 2007 रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाच्या वेळी ऐश्वर्या 33 वर्षांची होती तर अभिषेक 31 वर्षांचा होता.

हे लग्न बच्चन कुटुंबीयांच्या 'प्रतीक्षा' या बंगल्यावर झाले होते, तर रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये झाले होते. अमिताभ यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्न रॉयल बनवण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात ऐश्वर्याने तब्बल 75 लाख रुपये किंमतीची साडी नेसली होती. तर अभिषेकसाठी लग्नाची शेरवानी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती. नववधू ऐश्वर्याने लग्नात गोल्डन कलरची कांजीवरम साडी नेसली होती. नीता लुल्लाने ही साडी डिझाइन केली होती. साडीच्या बॉर्डरवर सोन्याच्या जरी लावण्यात आल्या होत्या आणि त्यावर Swarovski क्रिस्टल लावण्यात आले होते. लग्नाच्या पाच वर्षांनी दोघेही आराध्याचे आईबाबा झाले. आता आराध्या नऊ वर्षांची आहे.

ऐश्वर्याच्या कुंडलीत होता मंगळ दोष?
बातम्यांनुसार, लग्नापूर्वी ऐश्वर्याला घेऊन बच्चन कुटुंबीय अमर सिंह यांच्यासोबत वाराणसी येथे गेले होते. वाराणसी येथे संकट मोचन आणि विश्वनाथ मंदिरात विशेष पूजाअर्चा करण्यात
आली होती. ऐश्वर्याच्या कुंडलीत मंगळ दोष होता. त्याच्या निवारणासाठी बच्चन कुटुंबीयांनी पूजा केली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघांचे लग्न झाले होते. यूरोप येथे
अभि-ऐशने हनीमून साजरा केला होता.

लग्नापूर्वी ऐश्वर्या-अभिषेकने एकत्र केले होते 6 चित्रपट
ऐश्वर्या आणि अभिषेकने 'ढाई अक्षर प्रेम के' (2000), 'कुछ ना कहो' (2003), 'बंटी और बबली' (2005), 'उमराव जान'(2005), 'धूम-2' (2006), आणि 'गुरु' (2007) या 6 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तर लग्नानंतर दोघांचे 'सरकार राज' (2008) आणि 'रावन' (2010) हे चित्रपट रिलीज झाले.

यानंतर ऐश्वर्या 'गुजारिश' (2010) मध्ये दिसली. यानंतर तिने पर्सनल आयुष्यावर लक्ष केंद्रित केले आणि काही काळासाठी चित्रपटांपासून दूर झाली. 2015 मध्ये ऐश्वर्याने 'जज्बा' चित्रपटातून कमबॅक केले. नंतर ती 'सरबजीत' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016), फन्ने खां (2018) मध्ये दिसली. तर अभिषेकने 'रावन'नंतर 'धूम-3', 'हॅपी न्यू ईयर', 'हाउसफुल-3', 'मनमर्जियां', 'द बिग बुल' या चित्रपटांमध्ये काम केले.

बातम्या आणखी आहेत...