आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. जे.पी.दत्ता दिग्दर्शित 'रेफ्युजी' या चित्रपटाद्वारे अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 30 जून 2000 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता. 5 फेब्रुवारी 1976 मध्ये मुंबईत जन्मलेला अभिषेक अभिनेत्यासोबतच निर्माता, प्लेबॅक सिंगर आणि टीव्ही प्रेजेंटर असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.
LIC एजंट होता अभिषेक
अभिषेक बच्चनने 2000मध्ये सिनेमांत एन्ट्री केली. मात्र त्यापूर्वी तो काय करत होता हे कदाचितच कुणाला माहित असेल. सिनेमांत एन्ट्री करण्यापूर्वी अभिषेक LIC एजेन्ट होता. मात्र त्याने अभिनयात रुची दाखवल्याने LIC एजेन्ट होण्याच्या नाद सोडून दिला.
बालपणी 'डिसलेक्सिया' आजाराने त्रस्त होता अभिषेक
अभिषेक बच्चन आज फिट दिसत असला तरी बालपणी त्याला 'डिसलेक्सिया' आजार झाला होता. आमिर खानने या आजारावर 'तारे जमीन पर' सिनेमा तयार केला होता. यामध्ये दर्शिल सफारीने या आजाराने त्रस्त मुलाची भूमिका साकारली होती. या आजारामध्ये शब्द लक्षात ठेवणे, शब्द ओळख नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, लिहिणे, वाचणे आणि बोलण्यातसुध्दा अडथळा निर्माण होतो.
डान्समध्ये बिग बींचा गुरु आहे अभिषेक
1978मध्ये आलेल्या 'डॉन' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमातील 'खायके पान बनारसवाला' गाण्यावर बिग बींनी केलेल्या डान्सची खूप प्रशंसा झाली होती. या डान्ससाठी त्यांनी अभिषेककडून प्रेरणा घेतली होती. झाले असे, की अभिषेक केवळ 2 वर्षांचा होता आणि घरी तो फनी डान्स करायचा. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही फनी डान्स स्टेप्स आपल्या गाण्यात घेतल्या.
अभिषेक बच्चनचा 'रिफ्यूजी' होता 2000चा 5वा सर्वाधित कमाई करणारा सिनेमा
अभिषेक बच्चनने फिल्मी करिअरची सुरुवात 2000मध्ये आलेल्या जेपी दत्ता दिग्दर्शित 'रिफ्यूजी' सिनेमातून केली आणि त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. परंतु यावर्षीचा 5वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. अभिनेत्री करीना कपूरनेसुध्दा फिल्मी करिअरची सुरुवात याच सिनेमातून केली.
जेव्हा अमिताभ यांनी गिफ्ट दिला छोटा घोडा
अमिताभ यांनी अभिषेकला त्याच्या वाढदिवसाला छोटा घोडा दिला होता. अभिषेकसाठी हे गिफ्ट अनमोल होते.
अभिषेकने प्रियांकाला दिले 'पिगी चॉप्स' हे निकनेम
अभिनेत्री प्रियांका चोप्राला 'पिगी चॉप्स' हे निकनेम अभिषेकने दिले. 'ब्लफमास्टर' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक प्रियांकाला याच नावाने हाक मारत होता. आता हे प्रियांकाचे निकनेम पडले.
रिअॅलिटी शोसुध्दा केला होस्ट
अनेक प्रसिध्द अभिनेत्यांनी टीव्हीवर आपला अभिनय दाखवला आहे. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, गोविंदासारखे अभिनेतेसुध्दा त्यात सामील आहेत. ज्यूनिअर बच्चननेसुध्दा 2010 मध्ये कलर चॅनलवर प्रसारिता होणा-या 'नॅशनल बिंगो नाइट' शो होस्ट केला होता.
प्रॉडक्शनमध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड केला नावी
अभिषेक अभिनेता म्हणून ओळखला जातो, मात्र तो एक निर्मातासुध्दा आहे. त्याने आपल्या प्रॉडक्शनमध्ये 'पा'सारखा हिट सिनेमा तयार केला. 'पा' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी एका लहान मुलाचे पात्र साकारले होते. या सिनेमाने नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकला होता.
शिक्षणासाठी दिल्लीहून स्वित्झर्लंडला गेला, मात्र पूर्ण केले नाही शिक्षण
अभिषेक सिनेमांत हवे तसे यश संपादन करू शकला नाही, तसेच त्याला शिक्षणातही यश मिळाले नाही. त्याने दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षणास सुरुवात केली. त्यानंतर मुंबईच्या जमनाबाई नरसी आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये अर्धवट शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून तो स्वित्झर्लंडच्या एका प्रायव्हेट इंग्लिश बोर्डिंग स्कूल ऐग्लोन कॉलेजमध्ये गेला आणि तिथून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवी शिक्षण घेण्यासाठी बोस्टन यूनिव्हर्सिटीमध्ये गेला, परंतु काही कारणास्तव त्याने अर्ध्यातच शिक्षण सोडले.
मणिरत्नम यांच्या स्टेज शोमध्ये अभिषेकने केले आहे काम
2004मध्ये मणिरत्नम यांच्या 'युवा' सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणा-या अभिषेकने त्यांच्या स्टेज शोसाठीसुध्दा काम केले आहे. या सिनेमाच्या एक वर्षानंतर 2005मध्ये मणिरत्नम यांनी 'नेत्रू इन्द्रू नालाई' हा स्टेज शो केला होता. या शोमध्ये अभिषेकने महत्वाची भूमिका साकारली होती.
बोर्डिंग कार्ड्सचे कलेक्शन करण्याची आवड
अभिषेक बच्चनला बोर्डिंग कार्ड्सचे कलेक्शन करण्याची आवड आहे. तो फिरण्याचा शौकीन असून तो कुठेही फिरणे पसंत करतो. त्याच्याकडे आतापर्यंतच्या भ्रमंतीचे सर्व बोर्डिंग कार्ड्स आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.