आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील मोठे उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांच्या घरी होणाऱ्या प्रत्येक सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. त्यांच्या कार्यक्रमातील सेलिब्रिटींचे फोटोदेखील सोशल मीडियावर बघायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार, दिग्गद कलाकार पाहुणे मंडळींना जेवण वाढताना दिसत आहेत. 12 डिसेंबर 2018 रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत ईशा विवाहबंधनात अडकली होती. आता तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा पाहायला मिळत आहेत.
ईशा अंबानीच्या बिग फॅट वेडिंगमध्ये देश-विदेशातील पाहुणे मंडळी सहभागी झाले होते. तर या पाहुणेमंडळींसाठी खास चांदीच्या ताटात गोड-धोडाचे पदार्थ वाढण्यात आले होते. काही फोटोंमध्ये अमिताभ बच्चन, त्यांचा लेक अभिषेक आणि सून ऐश्वर्या, शाहरुख खान, आमिर खान हे सेलिब्रिटी पाहुणे मंडळींना जेवण वाढताना दिसले होते. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. अंबानी कुटुंबियांकेड जेवण वाढण्यासाठी माणसं असतानाही कलाकारांनी जेवण का वाढले? अंबानींसमोर बच्चनही कोण नाही... अशा प्रकारच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. आता यावर अभिषेक बच्चनने उत्तर दिले आहे.
'या' कारणामुळे सेलिब्रिटींनी पाहुण्यांना वाढले होते जेवण
सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर अभिषेकने एका पोस्टला उत्तर दिले होते. अभिषेकने सांगितले होते की, "ही एक सज्जन गोठ नावाची प्रथा असते. यात वधूकडच्या मंडळींनी वर पक्षाच्या मंडळींना जेवण वाढायचे असते. आम्ही हेच करत होतो," असे अभिषेकने म्हटले होते. ज्यांना ही प्रथा माहित आहे, त्यांनी बच्चन कुटुंबियांना सपोर्ट केला होता. ही एक प्रथा लग्नातील व्याही भोजनासारखी असते.
अभिषेकने दिलेल्या उत्तरानंतर अंबानींच्या लग्नात सेलिब्रिटी का जेवण वाढताना दिसले होते, याचे उत्तर ट्रोलर्सना मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.